Kane Williamson  Dainik Gomantak
क्रीडा

हार्दिकचं टेंशन वाढलं! केन विलियम्सन IPL 2023 मधून 'या' कारणानं बाहेर

गुजरात टायटन्सचा स्टार फलंदाज केन विलियम्सन आयपीएल 2023 मधून बाहेर झाला आहे.

Pranali Kodre

Kane Williamson Ruled Out of IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला दोन दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. पण दोन दिवसाच्या आतच गुजरात टायटन्सला तगडा झटका लागला आहे. गुजरातचा प्रमुख फलंदाज केन विलियम्सन आयपीएल 2023 स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात 31 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळताना विलियम्सनला गुडघ्याची दुखापत झाली आहे. त्यामुळे आता त्याला या संपूर्ण स्पर्धेतूनच बाहेर व्हावे लागले आहे. याबद्दल गुजरातच्या फ्रँचायझीकडून माहिती देण्यात आली आहे.

गुजरात टायटन्सने क्रिकेट संचालक विक्रम सोळंकी यांनी माहिती दिली की 'स्पर्धेच्या सुरुवातीलाच केनला दुखापतीमुळे गमावणे निराशाजनक आहे. आम्ही त्याला लवकर बरा होण्यासाठी शुभेच्छा देतो आणि आशा करतो की तो लवकरच मैदानात दिसेल.'

विलियम्सन आता भारतातून पुन्हा मायदेशी परतणार आहे. त्यानंतर मायदेशात त्याच्यावर पुढील उपचार होतील.

बाऊंड्री रोखण्याच्या प्रयत्नात दुखापत

विलियम्सन पहिल्या सामन्याच्या 13 व्या षटकात सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने मारलेल्या मोठ्या फटक्यावर चेंडूला सीमापार जाण्यापासून रोखताना जखमी झाला होता. चेंडू आडवताना तो त्याच्या उजव्या गुडघ्यावर पडल्याने त्याचा गुडघा दुखावला गेला. तो त्यावेळी वेदनेने कळवळला देखील.

त्यामुळे त्याच्यावर लगेचच मैदानावर उपचार करण्यात आले होते. पण त्याला नीट चालताही येत नसल्याने तो मेडिकल स्टाफच्या मदतीने मैदानातून बाहेर गेला. त्यानंतर तो मैदानात उतरला नाही. त्याच्या जागेवर फलंदाजीसाठी साई सुदर्शन इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरला होता.

केन विलियम्सनला आयपीएल 2023 लिलावातून हार्दिक पंड्या कर्णधार असेलल्या गुजरात टायटन्स संघाने 2 कोटी रुपयांच्या त्याच्या मुळ किमतीत खरेदी केले होते.

न्यूझीलंड संघ सोडून आयपीएलसाठी आला होता

दरम्यान, विलियम्सनला आयपीएलसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मुक्त केले होते. सध्या न्यूझीलंड श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिका खेळत आहेत. तसेच मे महिन्यात न्यूझीलंड पाकिस्तान दौऱ्यावर 5 वनडे आणि 5 टी20 सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी जाणार आहे.

पण या सर्व मालिकांमधून विश्रांती घेत विलियम्सनने आयपीएलमध्ये सहभाग नोंदवला होता. मात्र आता त्याला दुखापतीमुळे क्रिकेटपासूनच दूर राहावे लागणार आहे. आता तो किती दिवस या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर राहणार हे पाहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT