Shubman Gill Dainik Gomantak
क्रीडा

Shubman Gill Century: गिलने सेंच्युरी तर केलीच, पण IPL मध्ये 'हा' कारनामा करणारा बनला पहिलाच खेळाडू

सोमवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा युवा सलामीवीर शुबमन गिलने शतकी खेळी केली.

Pranali Kodre

Shubman Gill Century: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सचा युवा सलामीवीर शुबमन गिलने शतकी खेळी केली.

गिलने 56 चेंडूत शतकी खेळी केली. पण शतकानंतर गिल लगेचच बाद झाला. त्याने 58 चेंडूत 101 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. हे गिलचे आयपीएलमधील पहिलेच शतक ठरले आहे.

तसेच आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून शतक करणाराही तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी सर्वोच्च धावांची खेळी करणाऱ्या खेळाडूंमध्ये पहिल्या पाच खेळींमध्ये तीन गिलच्याच आहेत.

गुजरात टायटन्सकडून आयपीएलमध्ये सर्वोच्च धावा करणारे खेळाडू

  • 101 - शुभमन गिल

  • 96 - शुभमन गिल

  • 94* - डेव्हिड मिलर

  • 94* - शुभमन गिल

  • 87* - हार्दिक पंड्या

1000 धावाही पूर्ण

याबरोबरच गिलने गुजरात टायटन्ससाठी 1000 धावाही पूर्ण केल्या. त्यामुळे गुजरातसाठी 1000 धावा करणाराही तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. गिलच्या आता गुजरातसाठी 29 सामन्यांमध्ये 40.73 च्या सरासरीने 1059 धावा झाल्या आहेत.

गुजरातकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये गिलपाठोपाठ हार्दिक पंड्या आहे. हार्दिकने 27 सामन्यांमध्ये 776 धावा केल्या आहेत, तर डेव्हिड मिलर तिसऱ्या क्रमांकावर आहे. मिलरने 730 धावा केल्या आहेत.

दरम्यान, या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास गिलव्यतिरिक्त गुजरातकडून साई सुदर्शनने 47 धावांची खेळी केली. गिल आणि सुदर्शन यांच्या व्यतिरिक्त गुजरातकडून कोणालाही दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही. गुजराचे तब्बल 4 खेळाडू शुन्यावर बाद झाले. पण तरी गुजरातला 20 षटकात 9 बाद 188 धावा करता आल्या.

सनरायझर्स हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच मार्को यान्सिन, फझलहक फारुकी आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT