Ishant Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Ishant Sharma, VIDEO: इशांत शर्माच्या घातक चेंडूने फलंदाज गारद, डेल स्टेन म्हणाला, 'असं कधीच पाहिलं नव्हतं...'

IPL 2023: कॉपी करण्यासाठीही बुद्धी लागते असे म्हणतात. क्रिकेटमध्येही नकल होते. नकल बॉल, ज्याचा वापर अनेक गोलंदाज शस्त्र म्हणून करतात.

Manish Jadhav

IPL 2023: कॉपी करण्यासाठीही बुद्धी लागते असे म्हणतात. क्रिकेटमध्येही नकल होते. नकल बॉल, ज्याचा वापर अनेक गोलंदाज शस्त्र म्हणून करतात. पण, कोण किती अचूकतेने प्रयत्न करतो, यावरच सामन्यात सर्व काही अवलंबून असते. बरे, कोणी करो किंवा न करो, पण इशांत शर्मा नकलबॉलमध्ये मास्टर आहे, यात काही शंका नाही.

दरम्यान, गुजरात टायटन्सविरुद्धच्या (Gujarat Titans) सामन्यात इशांतने एकूण 24 चेंडू टाकले. पण, यापैकी त्याचा एक चेंडू असा होता, ज्याने खळबळ उडवून दिली. फलंदाजाना हादरवणारा, तो चेंडू खरच अवाक करणारा होता. खरं तर इशांतने टाकलेला तो नकल बॉल होता.

इशांत यामध्ये माहिर!

इशांतच्या नकल बॉलचा वेग ताशी 119 KPH होता. गुजरातच्या डावातील 5 वे षटक संपणार होते. तो नकल बॉल हा या षटकाचा शेवटचा चेंडू होता. मात्र, या चेंडूसमोर विजय शंकर इतका हतबल दिसला की, चेंडू कुठे लागला हेही त्याला कळले नाही.

यापूर्वी असा नकल बॉल कधीही पाहिला नाही – स्टेन

इशांतच्या या नकल बॉलचे आश्चर्य आणि अचूकता ज्या कोणी पाहिली त्याला याची खात्री पटली. इशांतला दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनकडून याबद्दल सर्वात मोठी प्रशंसा मिळाली, ज्याने ट्विट करत म्हटले की, मी विकेटसाठी नकल बॉलचा यापेक्षा चांगला वापर कधीही पाहिला नव्हता.

इशांतने ताशी 119 KPH वेगाने विकेट घेतल्या!

इशांत शर्माने (Ishant Sharma) नकल बॉलवर विजय शंकरची विकेट घेत सामन्यात आणखी एक विकेट घेतली. सामन्यातील शेवटचे षटक टाकताना त्याने राहुल तेवतियाच्या रुपात ही विकेट घेतली. इशांत शर्माने 4 षटकात 23 धावा देत 2 बळी घेतले. या दोन्ही विकेट त्याने ताशी119 KPH वेगाने घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT