CK Nayudu Trophy Cricket | Kashyap Bakhale  Dainik Gomantak
क्रीडा

CK Nayudu Trophy: गोव्याच्या कश्यप बखलेची वडिलांना ‘शतकी’ आदरांजली

शानदार फलंदाजी; गोवा-बिहार संघातील सामना अनिर्णित

Akshay Nirmale

CK Nayudu Trophy Cricket: क्रिकेटपटू कश्यप बखले याच्या वाटचालीत त्याचे वडील उदयकुमार प्रेरणास्त्रोत होते. काही दिवसांपूर्वी या 24 वर्षीय फलंदाजास पितृछत्रास अकाली मुकावे लागले, आघात जबर होता, मात्र स्वतःला सावरत, मानसिकदृष्ट्या कणखऱ बनत वास्कोतील या युवा क्रिकेटपटूने बुधवारी शानदार शतक ठोकले व स्वर्गीय पित्यास आदरांजली वाहिली.

गोवा व बिहार यांच्यातील 25 वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामना अनिर्णित राहिला. चार दिवसीय सामना पटना येथील मोईन-ऊल-हक स्टेडियमवर झाला. कर्णधारपदाची जबादारी यशस्वीपणे कश्यपने चमकदार शतकी खेळी केली. त्याने 172 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार लगावत 108 धावा केल्या. सामन्यातील आणखी एक शतकवीर वैभव गोवेकर (१२८ धावा, 159 चेंडू, 16 चौकार, 1 षटकार) याच्यासह कश्यपने तिसऱ्या विकेटसाठी 161 धावांची भागीदारी केली.

त्यामुळे दुसरा डाव 6 बाद 330 धावांवर घोषित करणे गोव्याला शक्य झाले. त्यांना एकूण 350 धावांची आघाडी मिळाली. बिहारने दुसऱ्या डावात 3 बाद 243 धावा केल्या व अनिर्णित निकालास संमती दिली. त्यांच्या डावात आकाश राज (100) याने नाबाद शतक ठोकताना अंकित राज (78) याच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी 152 धावांची भागीदारी केली.

गोव्याला अनिर्णित लढतीतून पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण, तर बिहारला एक गुण मिळाला. गोव्याचा स्पर्धेतील तिसरा सामना येत्या रविवारपासून (ता. 15) सांगे येथे गुजरातविरुद्ध खेळला जाईल.

कश्यपचे कणखर मनोबल ः स्वप्नील

‘‘वडिलास गमावल्यानंतर आयुष्य पूर्णतः बदलून जाते. जीवनातील या नाजूक कालखंडाने कश्यपला मानसिकदृष्ट्या कणखर बनवले हे निश्चित. शतक झळकावून त्याने वडिलांना आगळी श्रद्धांजली वाहिली. आमच्या 25 वर्षांखालील कर्णधारासाठी मी खूष आहे. त्याची ही खेळी पाहून त्याचे स्वर्गीय वडील निश्चितच आनंदित झाले असतील,’’ अशी प्रतिक्रिया गोव्याच्या 25 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक स्वप्नील अस्नोडकर यांनी कश्यपविषयी दिली.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः 267 व दुसरा डाव (2 बाद 172 वरून) ः 72.5 षटकांत 6 बाद 330 घोषित (वैभव गोवेकर 128, कश्यप बखले 108, दीप कसवणकर 26, तुनीष सावकार 43, योगेश कवठणकर नाबाद 7, आमोद यादव 2-70, सूरज कश्यप 3-92) अनिर्णित विरुद्ध बिहार, पहिला डाव ः 247 व दुसरा डाव ः 58.2 षटकांत 3 बाद 243 (अंकित राज 78, आकाश राज नाबाद 100, शुभम तारी 12.2-0-56-1, हेरंब परब 14-3-46-1, समीत आर्यन मिश्रा 12-1-36-0, कीथ पिंटो 12-1-51-1, दीप कसवणकर 8-1-41-0).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT