सनथ नेवगी (Goa Under-19) दैनिक गोमन्तक
क्रीडा

विनू मांकड करंडक Under-19 क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा पहिला विजय

गोव्याची आसामवर मात

Dainik Gomantak

पणजी: सलामीवीर सनथ नेवगीच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर गोव्याने बुधवारी विनू मांकड करंडक (Under-19) क्रिकेट स्पर्धेत विजयाची नोंद केली. पावसामुळे व्हीजेडी पद्धतीचा वापर केल्यानंतर गोव्याने आसामला चार विकेट राखून हरविले. एलिट क गट सामना अहमदाबाद येथील गुजरात महाविद्यालय मैदानावर झाला.

अहमदाबाद येथील पावसामुळे सामन्यातील डाव प्रत्येकी ४५ षटकांचे करण्यात आले. गोव्याने नाणेफेक जिंकून आसामला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. आसामने ५ बाद ९५ वरून ८ बाद १५४ धावांची मजल मारली. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा गोव्याने १५५ धावांच्या आव्हानासमोर ३१-५ षटकांत ६ बाद १२९ धावा केल्या होत्या.

‘मांकडिंग’ नियमानुसार बाद झालेल्या गोव्याच्या सनथने ७८ चेंडूंत सहा चौकार व एका षटकाराच्या मदतीने ५७ धावा केल्या. गोव्याला विजयाचे चार गुण मिळाले. काल मुंबईविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. गोव्याचा पुढील सामना हैदराबादविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Passport Fee Hike: परदेश प्रवास करणाऱ्यांना मोठा झटका! 1 जुलैपासून पासपोर्ट शुल्कात वाढ; अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर

Goa Yellow Alert: धुवांधार पाऊस अन् सोसाट्याचा वारा! गोव्यात पावसाची जोरदार बॅटिंग; पुढील 5 दिवस 'यलो अलर्ट'

Goa Crime: जाब विचारण्याची किंमत जीवाने! चिखली-कोलवाळ येथे मद्यधुंद युवकांकडून खून; नातेवाईकांनाही बेदम मारहाण

NCERT चा मोठा निर्णय! 9 वीच्या पुस्तकात आता 'आणीबाणी'ची एन्ट्री; पहिल्यांदाच विद्यार्थी शिकणार 1975 चा इतिहास

Goa Tourism Projects: 'टाऊन स्क्वेअर'ची मंत्र्यांकडून पाहणी, पर्यटन विकासासाठी केंद्राच्या सहकार्याची ग्वाही

SCROLL FOR NEXT