मागील महिन्यातील जोरदार वादळी पावसाचा चिखली-वास्को येथील इनडोअर स्टेडियमला जबरदस्त फटका बसला आहे,  Dainik Gomantak
क्रीडा

Goa: चिखलीतील स्टेडियम डागडुजीच्या प्रतीक्षेत

पावसामुळे येथील खराब झालेले इनडोअर स्टेडियममधील स्क्वॉश कोर्ट, बॅडमिंटन, टेबल टेनिस या तिन्ही खेळांच्या कोर्टचे पावसामुळे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील मागील महिन्यातील जोरदार वादळी पावसाचा (Heavy rain) चिखली-वास्को (Chikhali-Vasco) येथील इनडोअर स्टेडियमला (Stadium) जबरदस्त फटका बसला आहे, या ठिकाणी तातडीने डागडुजी (Repair) आवश्यक असून यासंबंधी गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव संदीप हेबळे यांनी लक्ष वेधले आहे.

चिखली इनडोअर स्टेडियममध्ये बॅडमिंटन, स्क्वॉश आणि टेबल टेनिस या खेळांच्या सुविधा आहेत. पावसामुळे या तिन्ही खेळांच्या कोर्टचे नुकसान झाले आहे. याठिकाणी स्पर्धा घेण्यासाठी किंवा सरावासाठी तातडीने दुरुस्ती आवश्यक आहे, तसे झाले नाही तर खेळाडूसाठी हे स्टेडियम धोकादायक असल्याचे हेबळे यांनी नमूद केले आहे. त्यांनी यासंदर्भात राज्याचे क्रीडा सचिव, क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे संचालक, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक, गोवा ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष-सचिव यांना पत्र पाठविले आहे.

कोविड-19 निर्बंध हटविल्यानंतर लवकरच इनडोअर स्टेडियम स्पर्धा-सरावासाठी उपलब्ध होईल, पण चिखली इनडोअर स्टेडियम धोकादायक स्थितीत असल्याने खेळाडूंना गंभीर दुखापती होण्याचा संभव आहे. याठिकाणी विद्युतव्यवस्था खराब झाल्याचे हेबळे यांनी पत्रात नमूद केले आहे. संबंधितांनी हानी झालेल्या चिखली इनडोअर स्टेडियमची पाहणी करून लगेच दुरुस्ती काम सुरू करावे, अशी मागणी हेबळे यांनी केली आहे.

क्रीडा व युवा व्यवहार खात्यानुसार यासंदर्भात गोवा क्रीडा प्राधिकरण आणि तांत्रिक विभागाला नुकसानीची माहिती देण्यात आली आहे. ते कामाचे अंदाजपत्रक तयार करतील आणि नंतर लगेच कामास सुरवात होईल, अशी माहिती हेबळे यांनी दिली.

‘‘वादळी पावसामुळे चिखली इनडोअर स्टेडियमची हानी झाली आहे. पाण्यामुळे खेळाचे कोर्ट फुगले आहेत. लाकडी भाग निखळले आहेत. त्यामुळे कोर्ट बदलणे आवश्यक आहे. नपेक्षा चिखलीतील हे कोर्ट खेळाडूंसाठी उपलब्ध नसतील.’’

- प्रवीण शेणॉय, अध्यक्ष चिखली स्पोर्टस क्लब

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT