Goa University Intercollegiate Badminton Tournament Dainik Gomantak
क्रीडा

Goa University Intercollegiate Badminton Tournament : गोवा अभियांत्रिकीने पुरुष गटात विजेतेपद राखले

महिला गटात विद्यापीठाचे पदव्युत्तर केंद्र विजेते

किशोर पेटकर

Goa University Intercollegiate Badminton Tournament : गोवा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत गतविजेत्या फर्मागुढीच्या गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाने पुरुष गटात विजेतेपद राखले. महिला गटात विद्यापीठाच्या पदव्युत्तर केंद्राने बाजी मारली. स्पर्धा कांपाल येथील इनडोअर स्टेडियममध्ये झाली.

महिलांच्या अंतिम लढतीत पदव्युत्तर केंद्राने गोवा वैद्यकीय महाविद्यालयास २-१ असे हरविले. विजेत्या पदव्युत्तर केंद्र संघात यास्मिन सय्यद, सर्वज्ञा पाटील, युक्ता नाईक, प्रियंवदा मौर्य यांचा समावेश होता. पुरुषांच्या अंतिम लढतीत अभियांत्रिकी महाविद्यालयाने फोंड्याच्या जीव्हीएम जीजीपीआर महाविद्यालयाला चुरशीच्या लढतीत ३-२ असे हरविले.

विजेत्या संघाचे सोहम शेट, दशरथ मांगेलकर, समर्थ कामत, साई कुंकळ्येकर, तेजस पिल्लई, यश पालेकर यांनी प्रतिनिधित्व केले. पुरुष गटातील जीव्हीएमचा चेतन मगदुम, तर महिलांत पदव्युत्तर केंद्राची यास्मिन सय्यद सर्वोत्तम खेळाडू ठरली.

बक्षीस वितरण गोवा बिझनेस स्कूलच्या साहाय्यक प्रोफेसर पूर्णिमा धुमे, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे बॅडमिंटन प्रशिक्षक रॉय अताईद, गोवा विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा साहाय्यक संचालक भालचंद्र जदार यांच्या उपस्थितीत झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT