Goa: कांपाल येथील इनडोअर स्टेडियम वास्तूचे संग्रहित छायाचित्र Dainik Gomantak
क्रीडा

स्टेडियमचा वापर निवडणुकीसाठी होत असल्याने क्रीडापटूंची गैरसोय

निवडणूक कारणास्तव कांपाल येथील इनडोअर स्टेडियम दीर्घ काळासाठी आरक्षित करण्यास क्रीडा संघटनांचा आक्षेप

Dainik Gomantak

Goa: आगामी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) संबंधित यंत्रणेने कांपाल येथील इनडोअर स्टेडियमचा (Campal Indoor Stadium) ताबा घेणार आहे, त्यामुळे याठिकाणी सराव करणाऱ्या क्रीडापटूंची गैरसोय (Inconvenience to athletes) होणार असून याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे.

निवडणूक कारणास्तव कांपाल येथील इनडोअर स्टेडियम दीर्घ काळासाठी आरक्षित करण्यास बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी क्रीडा संघटनांनी आक्षेप घेतला आहे. गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव संदीप हेबळे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत. क्रीडामंत्री मनोहर (बाबू) आजगावकर, राज्य क्रीडा सचिव, क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे संचालक, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक यांना पत्र लिहून क्रीडापटूंच्या संभाव्य गैरसोयीकडे लक्ष वेधले आहे.

कांपाल येथील इनडोअर स्टेडियम २२ ऑक्टोबरपासून निवडणूक ईव्हीएम मशीन चाचणीसाठी वापरले जाणार असल्याची माहिती गोवा क्रीडा प्राधिकरणातर्फे देण्यात आली आहे, असे हेबळे यांनी सांगितले. संबंधित यंत्रणेच्या ताब्यात इनडोअर स्टेडियम कधीपर्यंत असेल हे स्पष्ट करण्यात आलेले नसल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य निवडणूकविषयक बाबींसाठी कांपाल इनडोअर स्टेडियम वापरण्यात येणार असल्याने खेळाडूंच्या सरावावर परिणाम होणार असल्याचे हेबळे यांनी स्पष्ट केले.

हल्लीच गोवा क्रीडा प्राधिकरणाचे आमसभा मुख्यमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. त्यावेळी निवडणुकीसाठी स्टेडियमचा वापर केला जातो याबाबत गोवा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष व्हेरो नुनीस यांनी आक्षेप नोंदविला होता.

कोविड-१९ निर्बंधांमुळे राज्यातील इनडोअर स्टेडियम दीर्घकाळ बंद होती, हल्लीच पुन्हा स्टेडियमचा वापर क्रीडा सरावासाठी होऊ लागला. आता निवडणूक प्रक्रियेमुळे क्रीडापटू पुन्हा एकदा इनडोअर स्टेडियममधील सरावास मुकणार आहेत. ही कृती अन्यायकारक असल्याचे मत हेबळे यांनी व्यक्त केले.

``प्रत्येक निवडणुकीसाठी राज्यातील क्रीडा स्टेडियमचा ताबा संबंधित यंत्रणा घेते, त्यामुळे क्रीडापटूंचे मोठे नुकसान होते. निवडणूक प्रक्रियेसाठी इतरत्र पर्याय सरकारने शोधायला हवा. एकीकडे सरकार फिटनेसचा नारा देते आणि त्याचवेळी क्रीडापटूंना सरावापासून दूर ठेवले जाते हे अत्यंत चुकीचे आहे.``

-संदीप हेबळे, सचिव गोवा बॅडमिंटन असोसिएशन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT