Goa Table Tennis Dainik Gomantak
क्रीडा

Goa Table Tennis : गोमंतकीय टेबल टेनिस खेळाडूंवर अन्याय

स्पर्धा बहिष्काराचा इशारा : मुख्यमंत्री, क्रीडामंत्र्यांनी लक्ष घालण्याबाबत पालकांची पत्रकार परिषदेत मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Table Tennis : गोव्यात सुरू असलेल्या खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्रातील इतर राज्यातील खेळाडूंमुळे गोमंतकीय टेबल टेनिसपटूंवर अन्याय होत असल्याचे राज्यातील टेबल टेनिसपटूंच्या पालकांनी मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन दिले असून त्यांनी, तसेच क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी या प्रकरणी गोमंतकीय खेळाडूंना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

कांपाल-पणजी येथील खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्रात टेबल टेनिस व्यतिरिक्त बॅडमिंटन व जलतरण प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. विभागीय, तसेच राष्ट्रीय स्पर्धांत गोव्याचे प्रतिनिधित्व केलेल्या गोमंतकीय टेबल टेनिसपटूंना डावलून आसाम,

मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात व दिल्ली या राज्यातील खेळाडूंना गोव्यात सुरू असलेल्या खेलो इंडिया केंद्रात सामावून घेण्यात आल्याची माहिती पालकांच्या वतीने संजीव नाईक यांनी दिली.

खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता योजनेअंतर्गत आसाममध्ये तीन, गुजरात व मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी दोन, दिल्ली व उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एक केंद्र आहे, तरीही त्या राज्यातील खेळाडूंना गोव्यातील केंद्रात सामावून घेतल्याबद्दल संजीव नाईक यांनी सवाल उपस्थित केला.

या पत्रकार परिषदेत दिनेश धुळापकर, सचिन सुवारिस, विदुर पार्सेकर, अमित कारो, राजा दयाल, योगेश प्रभू, नागेश कामत, अरुण अगरवाल, सुशांत सुर्लकर, युसुफ शेख आदी खेळाडूंचे पालक उपस्थित होते.

तर बहिष्कार टाकू

खेलो इंडिया केंद्रात प्रशिक्षण घेणारे बाहेरगावचे खेळाडू स्थानिक स्पर्धांत भाग घेऊ लागले किंवा गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यात पात्र ठरले, तर स्थानिक खेळाडू या स्पर्धांवर बहिष्कार टाकतील असा इशारा पालकांच्या वतीने संजीव नाईक यांनी दिला.

खेळाडूच्या कारकिर्दीसाठी पालकांना २५ ते ३० लाख रुपये खर्च करावा लागतो. राष्ट्रीय अथवा विभागीय स्पर्धांसाठीही पालकांनाच खर्च करावा लागतो. त्याबदाल सरकारकडून एकही पैसा मिळत नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली.

संघटना मूग गिळून गप्प!

पालकांनी बाहेरगावच्या खेळाडूंसंदर्भात गोवा टेबल टेनिस असोसिएशनचे लक्ष वेधले, पण वरून दबाव असल्याचे या संघटनेचे पदाधिकारी सांगतात. या प्रकरणी संघटनेकडून कोणतेच सहकार्य मिळाले नसल्याचा दावा संजीव नाईक यांनी केला.

गोमंतकीय खेळाडूंना राज्यातील स्टेडियममध्ये खेळण्यासाठी, सरावासाठी शुल्क भरावे लागले, उलट खेलो इंडियातील खेळाडूंचा खर्च सरकारतर्फे केला जातो याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

स्थानिक स्पर्धांतही बाहेरगावच्या खेळाडूंचा सहभाग

संजीव नाईक यांनी सांगितले, की ‘‘गोव्यात होणाऱ्या स्थानिक स्पर्धांत खेलो इंडिया केंद्रात प्रशिक्षण घेणारे दुसऱ्या राज्यातील खेळाडू खेळतात, त्यामुळे स्थानिक खेळाडूंना मानांकन मिळत नाही.

भविष्यात दुसऱ्या राज्यातील खेळाडू गोव्याचे प्रतिनिधित्व करतील आणि गोमंतकीय खेळाडूंना संधी मिळणार नाही. स्थानिक स्पर्धांत दुसऱ्या राज्यातील खेळाडू जिंकला, तर त्या राज्याच्या नावाने जयघोष केला जातो आणि यामुळे गोमंतकीय खेळाडूंचे मनोधैर्य खच्ची होत आहे.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT