क्रीडा

Khelo India Para Games: गोव्याच्या चेतन साळगावकरने टेबल टेनिसमध्ये जिंकले मेडल

Khelo India Para Games 2023: खेलो इंडिया पॅरा राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याच्या खाती एकूण चार पदके

किशोर पेटकर

Goa Table-Tennis Player Chetan Salgaonkar settle for Bronze Medal in Khelo India Para Games 2023:

गोव्याचा टेबल टेनिसपटू चेतन साळगावकर याने पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या गट नऊमध्ये ब्राँझपदक पटकावले. राज्याला या स्पर्धेत मिळालेले हे चौथे पदक ठरले.

दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर स्पर्धा झाली. गोव्याने स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य व दोन ब्राँझपदकांची कमाई केली. पुरुषांच्या टेबल टेनिसमधील गट दोनमध्ये लॉईड फर्नांडिस याने सुवर्णपदक जिंकले.

ऍथलेटिक्समध्ये टी 11-12 प्रकारात साक्षी काळे हिला दोन पदके मिळाली. ती लांबउडीत रौप्यपदकाची, तर 100 मीटर शर्यतीत ब्राँझपदकाची मानकरी ठरली. चेतन साळगावकरला टेबल टेनिसमधील ब्राँझ मिळाले.

राष्ट्रीय पातळीवरील या महत्त्वाच्या पॅरा स्पर्धेत गोव्याचे सहा खेळाडू सहभागी झाले होते. गोवा क्रीडा प्राधिकरणाचे साहाय्यक संचालक (कार्यक्रम) विवेक पवार यांनी स्पर्धेत गोव्याचे चेफ द मिशन म्हणून जबाबदारी पेलली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT