Goa swimmer Sanjana Prabhugavkar in the Indian team Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याच्या जलतरणपटू संजना प्रभुगावकरची भारतीय संघात निवड

दक्षिण आफ्रिका जलतरण दौऱ्यासाठी भारताचा 16 सदस्यीय ज्युनियर संघ निवडण्यात आला आहे

दैनिक गोमन्तक

पणजी ः गोव्याची राष्ट्रीय पदकविजेती जलतरणपटू संजना प्रभुगावकर हिची भारतीय जलतरण संघात निवड झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत ज्युनियर उच्च कामगिरी शिबिर होईल आणि नंतर तेथेच स्पर्धा होईल, त्यात भारतीय जलतरणपटू सहभागी होतील.

दक्षिण आफ्रिका जलतरण महासंघाच्या सहकार्याने भारतीय जलतरण महासंघाने क्रीडा (Sports) व युवा व्यवहार खात्याच्या सहकार्याने जोहान्सबर्ग येथे 17 मार्च ते 17 एप्रिल या कालावधीत जलतरण शिबिर होईल. 

शिबिर संपल्यानंतर भारतीय ज्युनियर जलतरण संघ पोर्ट एलिझाबेथ येथे 22 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या जलतरण स्पर्धेत भाग घेईल. दक्षिण आफ्रिका जलतरण दौऱ्यासाठी भारताचा 16 सदस्यीय ज्युनियर संघ निवडण्यात आला आहे. जलतरणपटू मुंबई (Mumbai) येथून रवाना झाले. संघात 15 ते 17 वयोगटातील सहा मुलगे व आठ मुलींचा समावेश आहे. सध्या संजना संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथे ॲक्वा नेशन स्पोर्टस अकादमीत प्रदीप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

Asian Games Final IND vs PAK: सुवर्णपदकाच्या सामन्यात टीम इंडियाचा दबदबा! पाकिस्तानच्या खेळाडूंनी टाकल्या नांग्या, मिळवला दिमाखदार विजय

Goa Vegetable Market: काटेकणगी, करांदे बाजारात दाखल; कमी पावसामुळे कंदमुळे यंदा लवकर, कांदा मात्र 70 रुपयांवर

SCROLL FOR NEXT