Goa State Level Under 11 Chess Competition Dainik Gomantak
क्रीडा

Goa Chess Competition : बुद्धिबळात जोशुआ तेलिस विजेता; मुलींत स्कायला रॉड्रिग्ज अव्वल

स्पर्धा मळा-पणजी येथील महालक्ष्मी वाचन मंदिर सभागृहात झाली

किशोर पेटकर

Goa State Level Under 11 Chess Competition : जोशुआ तेलिस याने गोवा राज्यस्तरीय 11 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात विजेतेपद पटकावले, तर मुलींत स्कायला रॉड्रिग्ज विजेती ठरली. तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेने गोवा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने घेतलेली स्पर्धा मळा-पणजी येथील महालक्ष्मी वाचन मंदिर सभागृहात झाली.

जोशुआने सात फेऱ्यांतून सहा गुण, तर स्कायला हिने सहाही डाव जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. खुल्या गटात राजवीर पाटील याने उपविजेतेपद, तर सरस पोवार याने तिसरा क्रमांक पटकावला.

अर्विन आल्बुकर्क, आर्यव्रत नाईक देसाई, विहान तारी, अभीर प्रभू, रिशित गावस, आदित्य घाडगे व शुभ बोरकर यांनी अनुक्रमे चौथा ते दहावा क्रमांक प्राप्त केला. मुलींत रोचेल रॉड्रिग्ज उपविजेती ठरली, तर दिया सावळ हिला तिसरा क्रमांक मिळाला.

विधी नाईक, लिया सिल्व्हेरा, दिया नाईक, अवनी सावईकर, श्रेयशी फळदेसाई, जेन्सिना सिक्वेरा व म्युरिएल फर्नांडिस यांनी अनुक्रमे चौथा ते दहावा क्रमांक मिळविला.

वयोगटात (७ व ९ वर्षांखालील) गटात खुल्या विभागात शौर्य अग्रासनी, एकांग मालवणकर, प्रयांक गावकर, इव्हान तेलिस, एथन सिल्वेरा यांना, तर मुलींत सान्वी रेडकर, शिनेल रॉड्रिग्ज, शनाया देसाई, दृशा घोंगे, ईश्वरी राऊत यांना बक्षीस देण्यात आले.

गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, सत्यवान हरमलकर, दत्ताराम पिंगे, अरविंद म्हामल, आतिश नाईक, नरेश पेडणेकर, संदेश आमोणकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र

राज्यस्तरीय स्पर्धेत खुल्या आणि मुलींत पहिले दोन क्रमांक पटकावलेले खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यात पात्र ठरले आहेत. 11 वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धा आंध्र प्रदेशमध्ये १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT