Goa Sports Young chess player Nitish Belurkar qualifies for book IM  Dainik Gomantak
क्रीडा

युवा बुद्धिबळपटू नीतिश बेलुरकर ठरला ‘आयएम’ किताबासाठी पात्र

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याचा (Goa Sports) युवा बुद्धिबळपटू (Chess player) नीतिश बेलुरकर याच्यापाशी इंटरनॅशनल मास्टर (आयएम) किताबासाठी पाच नॉर्म होते, पण एलो मानांकनात तो 2400 गुणांपासून दूर होता, त्यामुळे किताबावर तांत्रिकदृष्ट्या शिक्कामोर्तब होऊ शकत नव्हते. कोरोना विषाणू महामारीमुळे जागतिक बुद्धिबळ ठप्प झाल्यामुळे नीतिशला गेल्या वर्षी मार्चपासून प्रतीक्षा करावी लागली. अखेर हंगेरीतील बुडापेस्ट येथील फर्स्ट सॅटरडे आंतरराष्ट्रीय साखळी बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत त्याने आवश्यक गुणांचा टप्पा गाठत ‘आयएम’ किताबासाठी पात्रता मिळविली.

नीतिशचे वडील संजय बेलुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीतिशने बुडापेस्ट येथील स्पर्धेच्या चौथ्या फेरीत मंगळवारी ग्रँडमास्टर आंद्रे कोवालेव याला बरोबरीत रोखून 2400 एलो गुणांचा टप्पा गाठला. या स्पर्धेपूर्वी त्याचे 2362 एलो गुण होते. तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यामुळे तो आता आयएम किताबधारक बनेल. आयएम किताबासाठी तीन नॉर्म आणि 2400 एलो गुण आवश्यक असतात. नीतिशपाशी पाच नॉर्म आहेत. यापूर्वी चेक प्रजासत्ताक, सर्बिया, अबुधाबी, मॉस्को येथील स्पर्धेत त्याने आयएम नॉर्म मिळविले होते. नीतिशने गेल्या आठवड्यात हंगेरीतील व्हेझेर्केप्झो ग्रँडमास्टर स्पर्धेत पाचवा आयएम नॉर्म मिळविताना 25.2 एलो गुणांची कमाई केली होती. फर्स्ट सॅटरडे स्पर्धेत त्याने एलो गुणांची संख्या वाढविताना अगोदरच्या फेरीत सर्बियन ग्रँडमास्टर मिसा पॅपला नमविले, नंतर ग्रँडमास्टर कोवालेव याला बरोबरीत रोखून लक्ष्यप्राप्ती केली.

म्हापसा येथील जीनो फार्मास्युटिकल्सचा नीतिश ‘सदिच्छा दूत’ आहे. आयएम किताबासाठी पात्र ठरल्याबद्दल ‘जीनो’चे कार्यकारी संचालक डॉ. सागर साळगावकर यांनी नीतिशचे अभिनंदन केले आहे. याशिवाय गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई, तो शिकत असलेल्या एस. एस. धेंपो महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. राधिका नायक, शारीरिक शिक्षण संचालक मायकल डायस, गोवा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी, तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी, राज्यातील क्रीडाप्रेमींनी नीतिशचे कौतुक केले आहे. नीतिश जागतिक शालेय बुद्धिबळ स्पर्धा, राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धा, आसियान बुद्धिबळ स्पर्धा, तसेच आशियाई ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेतील पदकविजेता आहे.

‘‘कोविड-19 मुळे नीतिश गेल्यावर्षी मार्चपासून स्पर्धात्मक बुद्धिबळपासून दूर राहिला. त्यामुळे आयएम किताबाची पूर्तता लांबली. हंगेरीतील स्पर्धेत नीतिशने दमदार खेळ केला आणि आवश्यक एलो गुणांचा टप्पा गाठला. ध्येयप्राप्तीसाठी तो प्रेरित होता. आता त्याचे पुढील लक्ष्य ग्रँडमास्टर किताबाचे आहे. या किताबासाठी नॉर्म मिळविण्यावर त्याचा हंगेरीतील बाकी स्पर्धांत खेळताना भर असेल.’’

- संजय बेलुरकर, नीतिशचे वडील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT