Goa Sports Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याची शिखा बनली भारत ‘क’ संघाची 'कर्णधार'

संजुलाचीही सीनियर महिला चॅलेंजर क्रिकेट स्पर्धेसाठी ‘ड’ संघात निवड..

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याची (Goa) अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू शिखा पांडे हिची आगामी सीनियर महिला चॅलेंजर क्रिकेट (Cricket) स्पर्धेसाठी भारत ‘क’ संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. या स्पर्धेसाठी गोव्याची (Goa Sports) संजुला नाईक हिलाही संधी मिळाली असून तिचा ‘ड’ संघात समावेश आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चॅलेंजर एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी चार संघांची शनिवारी घोषणा केली. स्पर्धा साखळी फेरी पद्धतीने 4 ते 9 डिसेंबर या कालावधीत आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे खेळली जाईल.

महिला चॅलेंजर स्पर्धेसाठी गोव्याच्या दोघा खेळाडूंची एकावेळी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिखालाही प्रथमच नेतृत्वाची संधी लाभत आहे. या महिन्यात विशाखापट्टणम-विझियानगरम येथे झालेल्या सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याने एलिट ड गटात शानदार कामगिरी बजावली होती. शिखाच्या नेतृत्वाखाली गोव्याने उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. बाद फेरीत गोव्याला पंजाबविरुद्ध हार पत्करावी लागली. त्या लढतीत शिखाने 49 व संजुलाने 40 धावा करून राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. संजुलाला दीर्घ कालावधीनंतर चॅलेंजर स्पर्धेसाठी संधी मिळाली आहे. यापूर्वी ती 19 वर्षांखालील वयोगटातील चॅलेंजर स्पर्धेत खेळली होती.

शिखाची अष्टपैलू कामगिरी

शिखाने सीनियर महिला एकदिवसीय स्पर्धेत शानदार अष्टपैलू खेळ केला. तिने मध्यफळीत खेळताना 6 सामन्यातील 5 डावात 144 धावा केल्या, तसेच वेगवान गोलंदाजीने 7 विकेटही टिपल्या. 32 वर्षीय भारतीय महिला क्रिकेट संघाची सदस्य आहे. 2014 पासून तिने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 3 कसोटींत 4 विकेट, 55 एकदिवसीय सामन्यांत 75 विकेट, तर 56 टी-20 सामन्यांत 40 विकेट घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: 'जीसीए'च्या तुळशीदास शेट्ये, हरीश शिंदेंना अटकपूर्व जामीन! सरकारी ऑडिटरला डांबून ठेवल्याचा, दबाव आणल्याचा आरोप

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

SCROLL FOR NEXT