Goa Sports 

 
Dainik Gomantak
क्रीडा

देवेश आणि गुंजल यांना 'बुद्धिबळ' स्पर्धेत विजेतेपद

राज्यस्तरीय 20 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेतील बक्षीसप्राप्त खेळाडूंसमवेत मान्यवर.

दैनिक गोमन्तक

पणजी (Goa Sports): राज्यस्तरीय 20 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात देवेश नाईक याने, तर मुलींत गुंजल चोपडेकर हिने विजेतेपद पटकाविले. धारबांदोडा तालुका बुद्धिबळ संघटनेतर्फे घेण्यात आलेली स्पर्धा केपे शासकीय महाविद्यालय सभागृहात झाली.

देवेशने बुद्धिबळ स्पर्धेत (Chess) सहा फेऱ्यांतून पाच गुणांची कमाई करताना चार विजय व दोन बरोबरी अशी अपराजित कामगिरी केली. रुबेन कुलासो, अनिरुद्ध पार्सेकर यांचेही पाच गुण झाले. टायब्रेकर गुणांत देवेश सरस ठरला व त्याला विजेतेपद मिळाले. रुबेन व अनिरुद्ध यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. मंदार लाड, एथन वाझ व पार्थ साळवी यांना अनुक्रमे चौथा ते सहावा क्रमांक मिळाला.

मुलींत अखेरच्या डावात गुंजल हिने अस्मिता रे हिला नमवून जेतेपद मिळविले. तिने पाच फेऱ्यांतून साडेचार गुणांची कमाई केली. नेत्रा सावईकर हिला विजेतेपद, तर अस्मिता हिला तिसरा क्रमांक मिळाला. वालंका फर्नांडिस, तन्वी हडकोणकर, जेनिसा सिक्वेरा यांना अनुक्रमे चौथा ते सहावा क्रमांक प्राप्त झाला.

अन्य वयोगटात रिशित गावस, म्युरियल फर्नांडिस, सत्यम फळ, दिया सावळ, अथर्व सावळ, साईजा देसाई यांनाही उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. 20 वर्षांखालील स्पर्धेच्या दोन्ही गटातील पहिले चार स्पर्धक राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र ठरले आहे. राष्ट्रीय स्पर्धा 12 जानेवारीपासून नवी दिल्लीत खेळली जाईल.

राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, किशोर बांदेकर, अमृत नाईक, संजय कवळेकर, नीतिश बेलुरकर, समीर नाईक, स्वप्नील होबळे, दिगंबर सावळ, संजय बेलुरकर, व्ही. बाळकृष्ण, नारायण वस्त यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT