Pearl Fernandes Dainik Gomantak
क्रीडा

Football: राष्ट्रीय ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत गोव्याच्या मुली अंतिम फेरीत

आसामविरुद्ध पर्ल फर्नांडिसची हॅटट्रिक

किशोर पेटकर

National Junior Football Tournament: जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या पर्ल फर्नांडिस हिच्या प्रेक्षणीय हॅटट्रिकच्या बळावर गोव्याने राष्ट्रीय ज्युनियर (१७ वर्षांखालील) महिला फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. राजस्थानमधील जोधपूर येथे शुक्रवारी झालेल्या लढतीत आसामवर ३-० असा सफाईदार विजय नोंदविला.

सामन्यातील सुमारे ७० मिनिटे दहा खेळाडूंसह खेळूनही गोव्याच्या मुलींनी एकतर्फी विजयास गवसणी घातली.

साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकलेल्या जोनाथन फालेरो यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचा हा सलग चौथा विजय ठरला. पर्ल हिने साखळी फेरीत आठ गोल नोंदविले होते. आता चार लढतीनंतर तिची एकूण वैयक्तिक गोलसंख्या ११ झाली आहे.

शुक्रवारी पर्ल हिने पहिला गोल १७व्या मिनिटास केला, नंतर अखेरच्या तीन मिनिटांतील खेळात आणखी दोन गोल नोंदविले. ८७व्या मिनिटास संघाची आघाडी वाढविल्यानंतर तिने ९०+४व्या मिनिटास हॅटट्रिक साधली.

पर्ल हिने पहिला गोल फातिमा ब्रागांझा हिच्या शानदार पासवर नोंदविला. सामन्याच्या ३३व्या मिनिटास गोव्याच्या प्रिस्सी परेरा हिला थेट रेड कार्ड दाखविण्यात आले, त्यामुळे बाकी कालावधीत दहा खेळाडूंसह खेळावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT