Goa Football: Sanson Pereira Dainik Gomantak
क्रीडा

Goa Football: सॅनसन परेरा एफसी गोवासाठी महत्त्वाचा खेळाडू

Goa Football: पहिल्याच मोसमात प्रभावी ठरलेल्या बचावपटूशी 2024 पर्यंत करार

किशोर पेटकर

पणजी : गतमोसमात फुटबॉल (Football) बचावपटू सॅनसन परेरा (Sanson Pereira) एफसी गोवासाठी (FC Goa) महत्त्वाचा खेळाडू ठरला, त्यामुळेच त्याच्या करारात आणखी तीन वर्षांसाठी वाढ झाली आहे. क्लबने त्याला गुरुवारी 2024 पर्यंत करारबद्ध केले.सॅनसन एफसी गोवा संघात गतवर्षी दाखल झाला. त्यानंतर पहिल्याच मोसमात त्याने प्रभावी कामगिरी बजावली. 2020-21 मोसमातील उत्तरार्धात तो एफसी गोवासाठी प्रमुख खेळाडू ठरला. एएफसी चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील एफसी गोवाच्या सहाही सामन्यांत 23 वर्षीय लेफ्ट-बॅक खेळाडूने स्टार्ट मिळविला आणि अशी कामगिरी करणारा तो क्लबचा एकमेव खेळाडू ठरला. याशिवाय इंडियन सुपर लीग (Indian Super League) स्पर्धेत तो चार सामने खेळला.

``एफसी गोवासोबतच्या पहिल्याच मोसमात मैदानावर, तसेच मैदानाबाहेर खूप प्रगती साधता आली. देशातील काही सर्वोत्कृष्ट खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी लाभली. हुआन फेरांडोसारख्या जबरदस्त प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेता आली. त्याचा लाभ स्वतःत नवा परिमाण शोधण्यात झाला,`` अशी प्रतिक्रिया सॅनसनने एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले. येत्या काही वर्षांत आणखी मोठा प्रभाव पाडण्याचे ध्येय त्याने बाळगले आहे. ``सॅनसनने पहिल्याच मोसमात प्रभावी कामगिरी बजावली. तो एक सच्चा व्यावसायिक असून संपूर्ण मोहिमेत त्याने चांगला दृष्टीकोन प्रदर्शित केला. तो शिकण्यास इच्छुक असतो आणि प्रत्येक दिवशी चांगल्या कामगिरीसाठी प्रयत्नशील असतो,`` असे एफसी गोवाचे प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी सॅनसन याच्याविषयी सांगितले. या वर्षी एफसी गोवाने करार वाढविलेला सॅनसन हा तिसरा फुटबॉलपटू आहे. ब्रँडन फर्नांडिस व ग्लॅन मार्टिन्स यांची करार मुदत यापूर्वीच वाढविण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT