अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाला (All India Chess Federation) एमपीएल (MPL) स्पोर्टस फाऊंडेशनकडून आर्थिक सहाय्य जाहीर करण्यात आले आहे. Dainik Gomantak
क्रीडा

Goa: बुद्धिबळ महासंघाला एमपीएल फाऊंडेशनकडून आर्थिक सहाय्य

महासंघाच्या नुतन कार्यकारिणीने जानेवारी 2021 मध्ये महासंघाच्या कारभारचा ताबा घेतला व गेल्या 9 महिन्यात भरीव यश संपादन केले. महासंघासाठी यशाचे नवे युग सुरु झाले असुन आम्ही यशाचे उंच शिखर गाठण्यासाठी प्रयत्नशील राहू असे डॉ. कपुर (Dr. Kapoor) यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाला (All India Chess Federation) एमपीएल (MPL) स्पोर्टस फाऊंडेशनकडून आर्थिक सहाय्य जाहीर करण्यात आले आहे. देशातील राष्ट्रीय स्तरावरील सर्व स्पर्धा हे फाऊंडेशन पुरस्कृत करणार असुन त्यासाठी पुढील पाच वर्षांत वर्षाकाठी एक कोटी रुपये  देणार असुन पुढील प्रत्येक वर्षी त्यात 20 टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे. ही माहिती महासंघाचे मानद सचिव भारत सिंग चौहान (Bharat Singh Chauhan) यांनी दिल्याचे महासंघाचे गोव्यातील (Goa) प्रतिनिधी तथा महासंघाच्या चेस (Chess) इन स्कुल समितीचे सदस्य आशेष केणी (Ashesh Keni) यांनी या प्रतिनिधीला सांगितले.

बुद्धिबळ महासंघाच्या इतिहासात कॉर्पोरेटद्वारे स्पर्धा पुरस्कृत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यासाठी महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय कपुर (Dr. Kapoor) तसेच मानद सचिव भारत सिंग चौहान यांनी फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले आहेत.

महासंघाच्या नुतन कार्यकारिणीने जानेवारी 2021 मध्ये महासंघाच्या कारभारचा ताबा घेतला व गेल्या 9 महिन्यात भरीव यश संपादन केले. महासंघासाठी यशाचे नवे युग सुरु झाले असुन आम्ही यशाचे उंच शिखर गाठण्यासाठी प्रयत्नशील राहू असे डॉ. कपुर यानी सांगितले आहे. जगामध्ये बुद्धिबळात भारताला नंबर एक क्रमांकाचा देश करुन दाखविण्याची किमया आम्ही निश्र्चितच करु असेही डॉ. कपुर म्हणाले.

आम्ही जे यश संपादन केले आहे त्याला आमचा बुद्धिबळाकडे पाहण्याचा आमचा निस्वार्थी दृष्टिकोण हे प्रमुख कारण असल्याचे भारत सिंग चौहान यानी सांगितले. भारताच्या महिला संघाने जागतिक बुद्धिबळ स्पर्घेत रौप्य पदक जिंकले. तसेच जागतिक ऑलिंपियाडमध्ये ग्रॅंडमास्टर विश्र्वनाथन आनंद यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या संघाने कांस्य पदक जिंकले.

या दैदिप्यमान व इतिहासिक कामगिरीमुळे बुद्धिबळाला सहाय्य करण्यास कॉर्पोरेट हाऊजीस पुढे सरसावत आहेत ही अभिमानास्पद व बुद्धिबळाच्या उज्वल यशासाठी चांगली गोष्ट आहे असे चौहान म्हणाले.

गेल्या 9 महिन्यात बुद्धिबळ महासंघाने आयोजित केलेले विविध कार्यक्रम, उपक्रम पुढील प्रमाणे ः- 1) आर्बिटरांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रम वर्गांचे आयोजन व 500 पेक्षा जास्त आर्बिटरांना प्रमाणपत्र वितरीत 2) चेस इन स्कूल उपक्रमात 1200 जणांना प्रशिक्षण3) राष्ट्रीय स्तरावरील 28 स्पर्धांचे आयोजन व 15 हजार पेक्षा जास्त खेळाडुंचा सहभाग 4) राष्ट्रीय स्पर्धांतील विजेत्यांना 40 लाख बक्षिस रक्कम वितरीत 5) बुद्धिबळ क्षेत्रातील व्यक्तिंसाठी कोविड मदत निधी 13 लाख रुपया जमा. विश्र्वनाथन आनंद, कोनेरु हंपी, द्रोणावली हरिका, विदीत गुजराती व इतर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडुंचे योगदान 6) तात्काळ मदतीसाठी 50 लाख रुपयांचा कल्याण निधी 7) आशियाई शालेय व पश्र्चिम विभागीय आशियाई स्पर्धेत 51 पदकांची लयलूट 8) ऑनलाईन जागतिक युवा स्पर्धेत भारताला चार पदके.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कर्करोग रुग्णांसाठी दिलासा! आता तासनतास चालणारे उपचार अवघ्या 7 मिनिटांत होणार पूर्ण; 'रोश'ने भारतात लाँच केले नवीन इंजेक्शन

VIDEO: 9 वर्षांच्या चिमुरड्यानं पाकिस्तानी स्टारची काढली हवा, क्लीन बोल्डचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोलिंग

Goa Road Safety: खचलेला रस्ता तातडीने दुरुस्त करा! उगवेतील नागरिकांची मागणी, उदय महाले यांच्याकडून निवेदन सादर

Egg Prices: ब्रॉयलर अंडी पुन्हा महाग; ८० रुपये डझन; पुरवठा मुबलक; तरीही शंभर अंड्यांमागे शंभर रुपयांनी झाली वाढ

Viral Video: टिनशेड वाचवायला गेला अन् 50 फूट उंच हवेत उडून शेतात कोसळला, बरेलीतील थरार व्हायरल; व्हिडिओ पाहून नेटकरी अचंबित

SCROLL FOR NEXT