Cricket Dainik Gomantak
क्रीडा

Ranji Trophy स्पर्धेत गोव्याला ‘क’ गट अपेक्षित

गोव्याचा संघ Ranji Trophyमध्ये 2018-19 मोसमात 'क' गटात खेळला होता, पण कामगिरी अतिशय खराब झाली होती.

दैनिक गोमन्तक

पणजी: आगामी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याला दहा संघांचा क गट अपेक्षित असेल. 2019-20 मोसमात प्लेट गटात अव्वल क्रमांक मिळवून गोव्याने पुन्हा एलिट गटासाठी पात्रता मिळविली होती. गतमोसमात कोविड-19 महामारीमुळे स्पर्धा होऊ शकली नव्हती. (Goa expected Group C in Ranji Trophy)

गोव्याचा संघ Ranji Trophyमध्ये 2018-19 मोसमात क गटात खेळला होता, पण कामगिरी अतिशय खराब झाली होती. नऊपैकी सात सामन्यांत पराभव पत्करावा लागला, तर फक्त दोन सामने अनिर्णित राहिले. त्यामुळे गटात एकदम तळात राहिल्यामुळे गोव्याला 2019-20मोसमात प्लेट गटात खेळावे लागले. या गटात गोव्याने नऊपैकी सात सामने सामने जिंकले व दोन सामने अनिर्णित राखून अव्वल स्थान मिळवत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्रता मिळविली होती, त्या फेरीत गोव्याला बलाढ्य गुजरातकडून मोठ्या फरकाने हार स्वीकारावी लागली.

यापूर्वी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोवा 2012-2013 ते 2016-17या कालावधीत व नंतर 2018-19 मध्ये एलिट क गटात खेळला, तर 2017-18 मोसमात ड गटात समावेश होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2021-22 मोसमाचे वेळापत्रक शनिवारी जाहीर केले, पण अजून संघांची गटवारी उघड केलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hadfade Birch Fire Case: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT