Goa Cricket Dainik Gomantak
क्रीडा

Goa Cricket संघाची सलामी लढत मुंबईशी

Goa Cricket : अहमदाबाद येथे विनू मांकड करंडक स्पर्धेतील सामने

दैनिक गोमंतक

पणजी ः विनू मांकड करंडक (Vinoo Mankad Trophy) १९ वर्षांखालील पुरुष एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा क्रिकेट (Goa Cricket) संघ पहिला सामना बलाढ्य मुंबईविरुद्ध (Mumbai) होणार आहे. एलिट क गटातील सर्व सामने अहमदाबाद येथे खेळले जातील. गोवा व मुंबई यांच्यातील सामना 28 सप्टेंबर रोजी मोटेरा-अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या ‘ब’ मैदानावर खेळला जाईल. याच मैदानावर गोव्याचा हैदराबादविरुद्ध 1 ऑक्टोबरला, तर राजस्थानविरुद्ध 4 ऑक्टोबरला सामना होईल. गोव्याचे अन्य दोन सामने अहमदाबाद येथील गुजरात कॉलेज मैदानावर होतील. या मैदानावर आसामविरुद्ध 29 सप्टेंबरला, तर त्रिपुराविरुद्ध 2 ऑक्टोबरला लढत होईल.

गोव्याच्या 19 वर्षांखालील महिला संघाची एकदिवसीय स्पर्धेतील मोहीमही 28 सप्टेंबरपासून सुरू होईल. गोव्याचा एलिट ब गटात समावेश असून लढती नागपूर येथे होतील. सिव्हिल लाईन्स येथील व्हीसीए स्टेडियमवर गोव्याचा संघ दिल्लीविरुद्ध 28 सप्टेंबरला, बंगालविरुद्ध 29 सप्टेंबरला खेळेल. नागपूर येथील लेडी अमृतबाई डागा कॉलेज मैदानावर 1 ऑक्टोबर रोजी झारखंडविरुद्ध, 2 ऑक्टोबरला पुदुचेरीविरुद्ध सामना होईल. गोव्याचा शेवटचा सामना 4 ऑक्टोबरला नागपूरमधील कळमणा येथील व्हीसीए स्टेडियमवर तमिळनाडूविरुद्ध होईल. बीसीसीआयच्या कोविड-19 प्रतिबंधक नियमानुसार दोन्ही संघांची विलगीकरण प्रक्रिया 20 सप्टेंबरपासून संबंधित स्पर्धा केंद्रावर सुरू होईल. सध्या गोव्याचे दोन्ही संघ पुण्यात सराव करत असून महाराष्ट्राच्या संघासमेवत सामनेही झाले आहेत. 19 वर्षांखालील पुरुष संघ प्रशिक्षक राजेश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली, तर 19 वर्षांखालील महिला संघ अनंत तांबवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सत्र सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT