एमसीसी क्रिकेट अकादमीतील प्रशिक्षणार्थी क्रिकेटपटूं व पदाधिकाऱ्यांसमवेत माजी कर्णधार महमद अझरुद्दीन. Dainik Gomantak
क्रीडा

क्रिकेटपटूंनी व्यसनापासुन दूर रहावे

माजी कर्णधार महमद अझरुद्दीन यांचा युवा क्रिकेटपटूंना सल्ला

Dainik Gomantak

Fatorda, Goa: क्रिकेटपटूंनी खास करुन युवा खेळाडूंनी सर्व व्यसनापासुन दूर रहावे. जास्त करुन मोबाईलचा वापर करु नये. त्यामुळे खेळाडूंच्या मानसीकतेवर परिणाम होतो असे भारताच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महमद अझरुद्दीन यानी मडगाव क्रिकेट क्लबच्या क्रिकेट अकादमीला आज सकाळी भेट दिली तेव्हा त्यांच्याकडे वार्तालाप करताना सांगितले.

ते पुढे म्हणाले की गोव्यात चांगले प्रतिभाशाली क्रिकेटपटू आहेत असे एैकले आहे. पण त्यांना योग्य संधी मिळत नाही. खेळाडुंनी जिद्द व यशाचे उंच शिखर गाठण्याचे स्वप्न उराशी बाऴगावे. केवळ राज्य संघामध्ये खेळुन भागणार नाही. त्यानी देशाचे प्रतिनिधितव करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवावे असेही त्यानी खेळाडूंना सांगितले. 

गोव्यामध्ये चांगल्या साधन सुविधा उपलब्ध आहेत. तरी गोव्याचा क्रिकेट दर्जा का वाढत नाही हेच कोडे आहे. या साधन सुविधांचा युवा खेळाडूंनी लाभ घ्यावा, जंक फूड वगैरे खाण्याच्या फंदात न पडता आहारावर लक्ष केंद्रीत करावे असेही त्यानी क्रिकेटपटूंना सांगितले. सद्याच्या भारतीय संघाच्या कामगिरीवर तसेच राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याचे टाळले.

महमद अझरुद्दीन 99 कसोटी सामने खेळताना 6215 धावा केल्या. शिवाय 334 एक दिवसीय सामन्यात त्यांच्या नावावर 9378 धावांची नोंद आहे. 47 कसोटीत व 174 एक दिवसीय सामन्यात भारताच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व करताना त्याने संघाला 14 तर 90 एक दिवसीय सामन्यात विजय मिळवुन दिला.

या त्याच्या भेटीच्या वेळी एमसीसीचे अध्यक्ष योगेश नायक, सचिव अपुर्व भेंब्रे, वेंकट देसाई, परेश पडियार, नगरसेवक सगुण उर्फ दादा नायक व प्रशिक्षक विनोद धामस्कर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT