Amit Yadav and Deepraj Gaonkar Dainik Gomantak
क्रीडा

IPL Auction 2023: गोव्याचे 'हे' 3 खेळाडूही होऊ शकतात मालामाल!

आयपीएल लिलावात गोव्याच्या 3 खेळाडूंचा समावेश आहे.

Pranali Kodre

IPL Auction 2023: इंडियन प्रीमीयर लीगच्या 16 व्या हंगामाचा लिलाव 23 डिसेंबर रोची कोची येथे होणार आहे. या लिलावाला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरुवात होणार आहे. या लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंसह अनेक युवा खेळाडूंचाही समावेश आहे.

आयपीएल 2023 लिलावासाठी एकूण 405 खेळाडूंची अंतिम निवड झाली आहे. यात गोवा क्रिकेट असोसिएशनच्या तीन खेळाडूंचाही समावेश आहे. हे तीन खेळाडू म्हणजे तुनिष सावकर, दीपराज गोवनकर आणि अमित यादव. या तिघांनीही देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे.

(Goa Cricketers in IPL Auction 2023)

24 वर्षीय तुनिषने आत्तापर्यंत 4 लिस्ट ए सामने खेळले आहेत, तर 6 टी20 सामने खेळले आहेत. तो उजव्या हाताचा फलंदाज असून त्याने लिस्ट ए सामन्यांमध्ये 75 धावा केल्या आहेत, तर टी20मध्ये 121 धावा केल्या आहेत. तो नुकताच गोव्याकडून विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्ये खेळला होता.

तसेच 24 वर्षीय दीपराजनेही गोव्याचे विविध वयोगटात प्रतिनिधित्व केले आहे. मधल्या फळीतील फलंदाज असलेल्या दीपराजने आत्तापर्यंत 3 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 17 लिस्ट ए आणि 32 टी२० सामने खेळले आहेत. त्याने 17 लिस्ट ए सामन्यांत 213 धावा आणि 32 टी20 सामन्यांत 331 धावा केल्या आहेत. त्याने टी20मध्ये 6 विकेट्सही घेतल्या आहेत.

अष्टपैलू अमित यादव गोव्याच्या टी20 संघातील नियमित सदस्य आहे. तो यापूर्वी आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाचाही भाग होता. त्याने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 40 प्रथम श्रेणी सामने खेळले असून यात 1008 धावा केल्या आहेत आणि 131 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच ४० लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 536 धावा केल्या असून 37 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर टी२० क्रिकेटमध्ये त्याने आत्तापर्यंत 48 सामने खेळले असून यात 333 धावा केल्या आहेत आणि 46 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, गोव्याच्या या तिन्ही क्रिकेटपटूंची आयपीएल 2023 लिलावासाठी 20 लाख मूळ किंमत आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कोणती फ्रँचायझी बोली लावणार का हे पाहावे लागेल.

आयपीएल लिलावात 400 हून अधिक खेळाडू

आयपीएल 2023 लिलावासाठी अंतिम निवड करण्यात आलेल्या 405 खेळाडूंपैकी केवळ 87 खेळाडूंनाच बोली लागू शकते. कारण 10 संघांमध्ये मिळून एकूण 87 खेळाडूंचीच जागा रिकामी आहे. यात 30 खेळाडू परदेशी असू शकतात. दरम्यान, 405 खेळाडूंपैकी 273 खेळाडू भारतीय आहेत, तर 132 खेळाडू परदेशी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT