Goa Cricket Association Dainik Gomantak
क्रीडा

Goa Cricket Association: स्टॅमिना क्लबला उत्तर विभागीय विजेतेपद

ब गट क्रिकेट : डिचोली क्लबला नमवून राज्य जेतेपदासाठी दावा

Kishor Petkar

पणजी : जबरदस्त फॉर्म प्रदर्शित केलेल्या स्टॅमिना क्रिकेट क्लबने आता जीसीए ब गट क्रिकेट स्पर्धेत राज्य विजेतेपदासाठी दावा केला आहे. उत्तर विभागीय अंतिम लढतीत शनिवारी त्यांनी डिचोली क्रिकेट क्लबवर 116 धावांनी दणदणीत विजय मिळविला. सामना पर्वरी येथील जीसीए मैदानावर झाला.

डिचोली क्लबने डिचोली-सत्तरी विभागात अव्वल राहत उत्तर विभागीय अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली होती. शुक्रवारी उपांत्य फेरीत सम्राट क्लबला नमविलेल्या स्टॅमिना संघाने तिसवाडी विभागात बाजी मारली होती. शनिवारच्या उत्तर विभागीय अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 199 धावा केल्या. त्यांच्या डावात सागर वंटमुरी याने सर्वाधिक 48 धावा केल्या.

अष्टपैलू सागर (4-28) व धनाजी कालेल (3-14) यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर डिचोली क्लबचा डाव ८३ धावांत संपुष्टात आला. राज्य विजेतेपदासाठी सोमवारी (ता. 30) तरवळे क्लब व स्टॅमिना क्लब यांच्यात लढत होईल.

संक्षिप्त धावफलक

स्टॅमिना क्रिकेट क्लब : 40 षटकांत 8 बाद 199 (सचिन सरदेसाई 14, प्रमोद नाईक 31, आदित्य दीक्षित 13, सागर वंटमुरी 48, संदीप राजभर 14, रुपेश सर्वणकर 27, राहुल गोसावी नाबाद 19, संजय नाईक 1-20, धवल हेमनाणी 2-36, अशोक राठोड 1-20, संकेत पांडे 2-29, अभिजित तलेका 1-52) वि. वि. डिचोली क्रिकेट क्लब : 22.5 षटकांत सर्वबाद 83 (धवल हेमनाणी 10, शैलेश मिस्कीन 15, संजय नाईक 14, हर्षद मातोणेकर 11, धनाजी कालेल 3-14, राहुल गोसावी 2-22, कृष्णा ठाकूर 1-6, सागर वंटमुरी 4-28).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT