Goa Chess Dainik Gomantak
क्रीडा

Goa Chess: निवडणुकीतील ‘जी-7’ गट एकसंध

Goa Chess: पाच तालुक्यातील एकाही प्रतिनिधीने उमेदवारी अर्ज सादर केला नाही

दैनिक गोमंतक

पणजी ः गोवा बुद्धिबळ संघटनेच्या (Goa Chess Association) आगामी निवडणुकीसाठी सात तालुक्यांचा (जी-7) गट एकसंध राहिल्यामुळे प्रतिस्पर्धी गट अस्वस्थ झाल्याची माहिती आहे. बाकी पाच तालुक्यातील एकाही प्रतिनिधीने शुक्रवारी उमेदवारी अर्ज सादर केला नाही. येत्या 22 ऑगस्टला नियोजित असलेल्या निवडणुकीसाठी पाच ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. बार्देश, डिचोली, पेडणे, सत्तरी, तिसवाडी, फोंडा, सासष्टी या सात तालुक्यातील प्रतिनिधींनी गुरुवारी एकत्रितपणे अर्ज सादर केले. आतापर्यंत एकूण 11 जणांचे अर्ज विविध पदासाठी दाखल झाले आहेत. त्यात महेश कांदोळकर, आशेष केणी, विश्वास पिळर्णकर ही प्रमुख नावे आहेत. धारबांदोडा, सांगे, केपे, काणकोण व मुरगाव या तालुक्यातील एकही अर्ज सादर झालेला नाही. गोवा बुद्धिबळ संघटनेशी एकूण 12 तालुका संघटना संलग्न आहेत. तालुका संघटनेतील प्रत्येकी दोन प्रतिनिधी निवडणुकीत भाग घेतील.

काब्राल यांच्या भूमिककडे लक्ष

प्राप्त माहितीनुसार, सध्याचे अध्यक्ष वीजमंत्री नीलेश काब्राल (Nilesh Cabral) पुन्हा निवडणूक लढविणार का याबाबत अजून स्पष्टता नाही. बुद्धिबळ निवडणूक रिंगणातील ‘जी-7’ गट काब्राल यांच्या समर्थनार्थ असलेल्या गटाच्या विरोधात आहे. सूत्राच्या माहितीनुसार, बहुमत नसल्यास काब्राल पुन्हा बुद्धिबळ संघटनेच्या निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता फारच कमी मानली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT