Goa chess Association Dainik Gomantak
क्रीडा

Goa Chess: कार्यकारी समितीत चौघे बिनविरोध

Goa Chess: अध्यक्षपदासाठी खासदार तेंडुलकर यांच्यासमोर कांदोळकर यांचे आव्हान

किशोर पेटकर

पणजीः राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर (Vinay Tendulkar) यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जामुळे राजकीय रंग चढलेल्या गोवा बुद्धिबळ संघटना (Goa Chess Association) कार्यकारी समिती निवडणुकीत (Executive Committee Election) गुरुवारी चौघे जण बिनविरोध ठरले, तर तेंडुलकर यांच्यासमोर तिसवाडीचे महेश कांदोळकर यांनी आव्हान उभे केले आहे. मावळते अध्यक्ष वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी निवडणुकीपासून दूर राहणेच पसंत केले. उत्तर गोव्यातील उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी तिसवाडीचे अरविंद म्हामल व डिचोलीचे सत्यवान हरमलकर, तर उत्तर गोव्यातील दोन संयुक्त सचिवपदासाठी पेडण्याचे ॲड. तुकाराम शेट्ये व सत्तरीचे कालिदास हरवळकर बिनविरोध ठरले आहेत.

अध्यक्षपदासाठीच्या एका जागेसाठी विनय तेंडुलकर (धारबांदोडा) व महेश कांदोळकर (तिसवाडी) यांच्यात थेट लढत होईल. सचिवपदासाठी सासष्टीचे आशेष केणी व काणकोणचे शरेंद्र नाईक यांच्यात चुरस असेल, तर खजिनदारपदासाठी मावळते सचिव किशोर बांदेकर (मुरगाव) यांना सध्याचे खजिनदार विश्वास पिळर्णकर (बार्देश) यांचे आव्हान असेल. संयुक्त खजिनदारपदाच्या एका जागेसाठी बार्देशचे रामचंद्र परब व प्रेषित देसाई यांच्यात लढत होईल. दक्षिण गोव्यातील दोन उपाध्यक्षपदासाठी सहा अर्ज आहेत. यामध्ये किशोर देसाई (सांगे), सागर साकोर्डेकर (फोंडा), किशोर बांदेकर (मुरगाव), दामोदर जांबावलीकर (सासष्टी), समीर नाईक (केपे), शरेंद्र नाईक (काणकोण) यांचा समावेश आहे. दक्षिण गोव्यातील दोन संयुक्त सचिवपदासाठी पाच उमेदवारी अर्ज असून त्यात अमोघ नमशीकर (फोंडा), किशोर देसाई (सांगे), अनिल गावकर (धारबांदोडा), शरेंद्र नाईक (काणकोण) व समीर नाईक (केपे) हे उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज सादर करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता, येत्या मंगळवारपर्यंत (10) उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष शिरोडकर यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारले. एकापेक्षा जास्त जागेसाठी अर्ज भरलेल्यांत आशेष केणी यांनी अध्यक्ष व खजिनदारपदाचा, महेश कांदोळकर यांनी सचिव व खजिनदारपदाचा, विश्वास पिळर्णकर यांनी अध्यक्ष व सचिवपदाचा, तर दामोदर जांबावलीकर यांनी संयुक्त सचिवपदाचा अर्ज मागे घेतला.

दृष्टिक्षेपात निवडणूक...

- निवडणूक तारीख 22 ऑगस्ट, कार्यकारी समितीत एकूण 12 जागा

- 4 उमेदवार बिनविरोध, उत्तर गोवा उपाध्यक्ष व संयुक्त सचिव प्रत्येकी 2 पदे

- 8 जागांसाठी 19 उमेदवार निवडणूक रिंगणात

- अध्यक्ष, सचिव, खजिनदार, संयुक्त खजिनदारपदासाठी थेट लढत

- दक्षिण गोव्यात 2 उपाध्यक्षपदासाठी 6, तर 2 संयुक्त सचिवपदासाठी 5 उमेदवार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT