Badmiton Players Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याच्या खेळाडूंची दुहेरी बॅडमिंटनमध्ये 'Bronze' पदकाची कमाई

पश्चिम विभाग आंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धेत गोव्याच्या खेळाडूंनी दुहेरीत चमक दाखविली

दैनिक गोमन्तक

Panjim: पश्चिम विभाग आंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धेत (Western Division Interstate competition) गोव्याच्या खेळाडूंनी दुहेरीत चमक दाखविली. सीनियर, तसेच 19 वर्षांखालील ज्युनियर गटातील स्पर्धा महाराष्ट्रातील परभणी येथे झाली.

सांघिक गटात यजमान महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगडच्या खेळाडूंनी दबदबा राखला. सीनियर पुरुष एकेरीत गुजरातचा आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रियांशू राजावत, तर महिलांत गुजरातची अदिता राव, तसेच 19 वर्षांखालील मुलांत छत्तीसगडचा रौनक चौहान विजेता ठरला. अदिता हिने 19 वर्षांखालील मुलींच्या एकेरीतही बाजी मारली.

दुहेरीत गोव्याच्या खेळाडूंनी उपांत्य फेरी गाठत ब्राँझपदकाची (Bronze Medal) कमाई केली. पुरुष दुहेरीत अर्जुन फळारी-तेजन फळारी, मुलांच्या दुहेरीत आर्यमान सराफ-यश हळर्णकर, मुलींच्या दुहेरीत अनार सिंगबाळ-नेहा सहकारी, मिश्र दुहेरीत तेजन फळारी-यास्मिन सय्यद यांनी उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली.

स्पर्धेतील गोव्याच्या कामगिरीविषयी गोवा बॅडमिंटन (Badmiton) संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांनी सांगितले, की ‘‘आमच्या युवा खेळाडूंसाठी स्पर्धेतील अनुभव हा शिकण्याची योग्य प्रक्रिया ठरली. यश देसाई, अनीश कामत, आरोही कौठणकर, निशांत शेणई, अर्जुन फळारी यांच्यासह इतर उदयोन्मुख खेळाडूंची कामगिरी उत्साहवर्धक झाली. खेळाडूंना जास्त पदके मिळाली नाही, परंतु त्यांना देशातील उच्च मानांकित खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली, जेणेकरून आणखी मेहनत घेण्यासाठी ते प्रेरित बनले आहेत. एकंदरीत गोव्यातील बॅडमिंटनसाठी भवितव्य उज्ज्वल असल्याचे जाणवते.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

SCROLL FOR NEXT