Sakshi Kale 
क्रीडा

Khelo India Para Games: गोव्याच्या साक्षी काळेला लांबउडीत रौप्यपदक

Khelo India Para Games 2023: खेलो इंडिया पॅरा राष्ट्रीय स्पर्धेत गोव्यासाठी एकूण दोन पदकांची कमाई

किशोर पेटकर

Goa athlete Sakshi Kale won second Medal at Khelo India Para National Games 2023 :

गोव्याची प्रतिभावान पॅरा ऍथलीट साक्षी काळे हिने पहिल्या खेलो इंडिया पॅरा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आणखी एक पदक जिंकण्याचा पराक्रम साधला. मंगळवारी तिने महिलांच्या टी11-12 गटातील लांबउडीत रौप्यपदकाची कमाई केली.

नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे. उसगाव येथील 18 वर्षीय साक्षीचे हे खेल इंडिया पॅरा राष्ट्रीय स्पर्धेतील अंधत्व खेळाडूंच्या गटातील दुसरे पदक आहे.

सोमवारी साक्षीने 100 मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकले होते. साक्षी हिची दोन प्रकारात निवड झाली होती.

साक्षीच्या रौप्य व ब्राँझपदक कमाईमुळे गुणतक्त्यात आता गोव्याच्या खाती दोन पदकांची नोंद झाली आहे. राज्यासाठी दोन पदके जिंकणाऱ्या साक्षी हिचे स्पर्धेतील गोव्याचे चेफ द मिशन विवेक पवार यांनी अभिनंदन केले आहे.

`खेलो इंडिया पॅरा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत माझी दोन गटात निवड झाली होती. दोन्ही गटात पदके जिंकल्यामुळे मी खूप खूष आहे. काल धावण्याच्या शर्यतीत पाय दुखत होता, मात्र लांबउडीत त्रास जाणवला नाही, त्यामुळे रौप्यपदकापर्यंत प्रगती साधता आली. निवड झालेल्या दोन्ही गटात पदके जिंकण्याचे ध्येय होते आणि ते साध्य झाल्यामुळे आनंद द्विगुणित झाला,` असे साक्षी हिने नवी दिल्ली येथून सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT