तुनीष सावकार
तुनीष सावकार Dainik Gomantak
क्रीडा

तमिळनाडूस धक्का देत गोव्याची आगेकूच

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याच्या युवक संघाने 25 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट (cricket )स्पर्धेतील स्पृहणीय कामगिरीची मालिका कायम राखताना शुक्रवारी बलाढ्य तमिळनाडूस धक्का दिला.

बंगळूरमध्ये (Bangalore) पाऊस आला तेव्हा तमिळनाडूस (Tamil Nadu) विजयासाठी 19.4 षटकांत 50 धावा हव्या होत्या व 3 विकेट बाकी होत्या, मात्र गोव्याची धावगती सरस ठरली. त्यांनी व्हीजेडी पद्धतीनुसार सामना 9 धावांनी जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. गोव्याची पुढील लढत बंगळूर येथेच रविवारी पंजाबविरुद्ध होईल. या वयोगटात गोव्याने प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

स्पर्धेतील पहिलाच सामना खेळणाऱ्या तुनीष सावकार याने संधी साधली. त्याने 128 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 86 धावा केल्या. पहिलाच सामना खेळणाऱ्या मोहित रेडकर (26 व 2-42) याचे अष्टपैलू योगदानही महत्त्वपूर्ण ठरले. गोव्याने प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर सर्वबाद 207 धावा केल्या. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा तमिळनाडूने 30.2 षटकांत 7 बाद 158 धावा केल्या होत्या.

31 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर हेरंब परब याने तमिळनाडूच्या आर. एस. जगन्नाथ श्रीनिवास याला कश्यप बखले याच्याकरवी झेलबाद केले, यावेळी पाऊस सुरू झाला आणि गोव्याची व्हीजेडी पद्धतीत स्थिती सुधारली. त्यापूर्वी मोहितने तमिळनाडूचा आक्रमक सलामीवीर एस. अरविंद व तुषार रहेजा यांना बाद करून गोव्याला यश मिळवून दिले. नंतर निहाल सुर्लकर व धीरज यादव यांनी तमिळनाडूची 22 व्या षटकात स्थिती 6 बाद 113धावा अशी बिकट केली.

तुनीषची दमदार फलंदाजी

फॉर्ममधील मंथन खुटकर, कश्यप बखले यांच्यासह आदित्य सूर्यवंशी असे तीन फलंदाज गोव्याने 38 धावांत गमावल्यामुळे गोव्याचा डाव संकटात सापडला होता. तुनीषने कर्णधार सुयश प्रभुदेसाईच्या (36 ) साथीत डावाला आकार देताना चौथ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. नंतर तळात मोहितने फटकेबाजी केल्यामुळे गोव्याची धावसंख्या फुगली. तुनीषचे शतक 14 धावांनी हुकले, व्ही. गौतमच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत बाद झाला.

पुढील सामन्यात सुयश नाही

25 वर्षांखालील संघातील कर्णधार सुयश प्रभुदेसाई, मंथन खुटकर, कश्यप बखले, निहाल सुर्लकर, मोहित रेडकर यांची विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेसाठी सीनियर संघात निवड झाली आहे. विजय हजारे करंडक स्पर्धा रांची येथे 8 डिसेंबरपासून खेळली जाईल. युवक संघाने आगेकूच राखल्यामुळे या संघातील केवळ सुयश विलगीकरण प्रक्रियेसाठी सीनियर संघात रुजू होईल, त्यामुळे तो पुढील सामना खेळू शकणार नाही, अशी माहिती गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव विपुल फडके यांनी दिली.

संक्षिप्त धावफलक

गोवा:

46.3 षटकांत सर्वबाद 207 (आदित्य सूर्यवंशी 15 , मंथन खुटकर 16 , कश्यप बखले 1, सुयश प्रभुदेसाई 36 , तुनीष सावकार 86 , संकेत मोरजकर 8 , निहाल सुर्लकर 3 , मोहित रेडकर 26 , हेरंब परब 0 , धीरज यादव 4 , समीत आर्यन मिश्रा नाबाद 0 , व्ही. गौतम 3-28 , एस. अजित राम 5-43)

वि. वि. तमिळनाडू : 30.2 षटकांत 7 बाद 158 (एस. अरविंद 48, निधिश राजगोपाळ 27 , एस. लोकेश्वर 12 , यू. मुकिलेश नाबाद 32 , आर. एस. जगन्नाथ श्रीनिवास 11 , हेरंब परब 6.2-1-31-1, समीत आर्यन मिश्रा 4-0-33-0 मोहित रेडकर 8.3-0-42-2 , धीरज यादव 7-0-27-1, निहाल सुर्लकर 4.3-0-21-2

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT