All Goa Shooting Competition
All Goa Shooting Competition Dainik Gomantak
क्रीडा

Goa: राज्यस्तरीय नेमबाजीत आदित्यला 'सुवर्णपदक'

दैनिक गोमन्तक

पणजी: रायफल शुटिंग असोसिएशन गोवा (Rifle Shooting Association Goa) आणि यश शुटिंग अकादमी यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या तिसऱ्या अखिल गोवा नेमबाजी स्पर्धेत (All Goa Shooting Competition) आदित्य सावंत (Aditya Sawant) याने दोन सुवर्णपदके जिंकली. स्पर्धेचे बक्षीस वितरण भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी डॉ. स्नेहा गिते (Dr. Sneha Gite) कर्करोग तज्ज्ञ डॉ. जयेश राणे, रायफल शुटिंग असोसिएशन, गोवाचे अध्यक्ष किशोर शेट मांद्रेकर, यश शुटिंग अकादमीचे अध्यक्ष योगेश पाडलोस्कर, आंतरराष्ट्रीय नेमबाज विक्रम भांगले, भाग्यश्री पाडलोस्कर यांच्या उपस्थितीत झाले. योगेश पाडलोस्कर यांनी स्वागत केले, तर चंद्रहास दाभोळकर यांनी आभार मानले. स्पर्धेचे बक्षीस वितरण म्हापसा येथे झाले.

निकाल ः पुरुष गट ः 10 मीटर ओपन साईट रायफल-पुरुष ः युवराज आळवे, कुंदन नागवेकर, प्रवीण गावस, 10 मीटर रायफल-पुरुष युवा ः आदित्य सावंत, यश आसोलकर, दिलन दुबे, 10 मीटर रायफल-सीनियर पुरुष ः आदित्य सावंत, यश आसोलकर, प्रशील प्रभू, 10 मीटर पिस्तुल-सीनियर पुरुष ः साईनेश गडेकर, प्रशांत पावसकर, सन्मेश फडते, 25 मीटर स्टँडर्ड पिस्तुल- सीनियर पुरुष ः अतुल नाखरे, 50 मीटर प्रोन रायफल-सीनियर पुरुष ः सिद्धार्थ राऊत, अनिल सासोलकर, ड्रिस्लॉन आल्मेदा.

10 मीटर रायफल- सीनियर महिला ः एल्ड्रिडा फर्नांडिस, आर्यकी राठोड, मैत्री दास, 10 मीटर एअर पिस्तुल-सीनियर महिला ः श्रीया नाखरे, विशाखा वेळुस्कर, 50 मीटर रायफल प्रोन- सीनियर पुरुष ः यश पाडलोस्कर.

आयएसएसएफ गट विजेते ः अतुल नाखरे, यश पाडलोस्कर, आकांक्षा शिंदे, नेल्सन दुबे, यश पवार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: सहा लाखांचा माल जळून खाक; मोलेत बर्निंग ट्रकचा थरार

Margao News : मतदानाला प्रेरित करण्‍यास पॅरा ग्‍लायडर्सचा वापर : आश्‍वीन चंद्रू

Heavy Rainfall in Brazil: ब्राझीलमध्ये पावसाचा कहर, दक्षिणेकडील राज्यात 10 जणांचा मृत्यू; राज्यपालांनी दिला आपत्तीचा इशारा

Goa Loksabha Election: ‘सायलंट’ मतदार दाखवणार करिष्मा; फोंड्यात ‘गोमन्तक-टीव्ही’ महाचर्चा

Margao District Hospitals : जिल्हा रुग्णालयाचे खासगीकरण रद्द करणार : विरियातोंचे आश्वासन

SCROLL FOR NEXT