Glenn Maxwell X/cricketcomau
क्रीडा

Glenn Maxwell: मॅक्सवेलचं वादळ घोंगावलं! जखमी असून ठोकली डबल सेंच्यूरी, पाहा Video

Glenn Maxwell Double Century: वर्ल्डकप २०२३ मध्ये ग्लेन मॅक्सवेलने जखमी असूनही द्विशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, Australia vs Afghanistan, Glenn Maxwell Double Century:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत मंगळवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान संघात सामना पार पडला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने द्विशतक ठोकत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर 292 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मॅक्सवेलने कर्णधार पॅट कमिन्सबरोबर आठव्या विकेटसाठी नाबाद 202 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला 47 व्या षटकात विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे मॅक्सवेलचा पाय जखमी झाला होता, ज्यावर त्याने फलंदाजी करताना उपचारही घेतले.

यावेळी ग्लेन मॅक्सवेलने 128 चेंडूत 201 धावांवर नाबाद राहिला. या खेळीत त्याने 21 चौकार आणि 10 षटकार मारले.

तो वनडे वर्ल्डकपमध्ये द्विशतक करणारा मार्टिन गप्टील आणि ख्रिस गेल यांच्यानंतरचा तिसराच फलंदाज ठरला आहे. गप्टील आणि गेल या दोघांनीही 2015 वर्ल्डकपमध्ये द्विशतक ठोकले होते. तसेच मॅक्सवेल वनडेत द्विशतक करणारा नववा क्रिकेटपटू ठरला आहे.

या सामन्यात अफगाणिस्तानच्या 292 धावांच्या आव्हानाच पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली होती. त्यांनी 91 धावांत 7 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर मॅक्सवेलने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने एकहाती सामना फिरवण्यास सुरुवात केली.

यादरम्यान, त्याला फारसे पळता येत नसल्याने त्याने मोठे फटके खेळण्यावर भर दिला. यावेळी त्याला एक बाजूने पॅट कमिन्सने दमदार साथ दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 292 धावांचे आव्हान 46.5 षटकात पूर्ण केले. कमिन्स 68 चेंडूत 12 धावांवर नाबाद राहिला.

मॅक्सवेल - कमिन्सचा विश्वविक्रम

वनडे क्रिकेटमध्ये 8 व्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी करण्याचा विश्वविक्रमही मॅक्सवेल आणि कमिन्सने केला आहे. वनडेत 8 व्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी करणारी या दोघांची पहिली जोडी ठरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT