Maxwell IPL exit Dainik Gomantak
क्रीडा

Glenn Maxwell: सी यू सून...क्रिकेट चाहत्यांना पुन्हा धक्का; ग्लेन मॅक्सवेलचा आयपीएलला 'राम राम'!

Glenn Maxwell IPL News: ऑस्ट्रेलियाचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने २०२६च्या लिलाव यादीत आपले नाव समाविष्ट न करण्याचा निर्णय घेतला

Akshata Chhatre

Glenn Maxwell IPL retirement 2025: ऑस्ट्रेलियाचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने एक मोठा निर्णय जाहीर केलाय. त्याने आयपीएल २०२६ च्या खेळाडूंच्या लिलाव यादीत आपले नाव समाविष्ट न करण्याचा निर्णय घेतला असून मॅक्सवेलने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून याबद्दलची माहिती दिली आहे, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे.

दुखापत आणि खराब फॉर्म

मॅक्सवेलला आयपीएल २०२५ च्या लिलावात पंजाब किंग्जने ४.२ कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र, मागचा हंगाम त्याच्यासाठी फारसा चांगला ठरला नाही. त्याने खेळलेल्या नऊ सामन्यांमध्ये त्याला केवळ ७८ धावा करता आल्या आणि त्याने चार बळी घेतले. फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला हंगामातून अर्ध्यातच बाहेर पडावे लागले होते, ज्यामुळे त्याच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

'या लीगने मला घडवले'

आयपीएल सोडण्याचा निर्णय 'मोठा' असल्याचे मॅक्सवेलने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. "आयपीएलमधील अनेक अविस्मरणीय हंगामानंतर, मी यावर्षी लिलावात माझे नाव न देण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक मोठा निर्णय आहे आणि या लीगने मला जे काही दिले, त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे," असे त्याने लिहिलेय.

मॅक्सवेलने २०१२ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. २०१४ मध्ये त्याने ५४२ धावांसह आपला सर्वोत्तम हंगाम खेळला होता. त्यानंतर २०१७ मध्ये ३१० धावा, २०२१ मध्ये ५१३ धावा, २०२२ मध्ये ३०१ धावा आणि २०२३ मध्ये ४०० धावा असे त्याचे उल्लेखनीय प्रदर्शन राहिले होते.

चाहत्यांना दिला भावनिक निरोप

आयपीएलमुळे मला एक क्रिकेटपटू आणि व्यक्ती म्हणून घडायला मदत झाली, असेही मॅक्सवेलने नमूद केले. "मला जागतिक दर्जाच्या सहकाऱ्यांसोबत खेळण्याची, अविश्वसनीय फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व करण्याची आणि ज्यांची आवड अतुलनीय आहे, अशा चाहत्यांसमोर कामगिरी करण्याची संधी मिळाली.

या आठवणी, आव्हाने आणि भारतातील ऊर्जा माझ्यासोबत कायम राहील. अनेक वर्षांच्या तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटू," असे म्हणत मॅक्सवेलने भारतीय चाहत्यांचा निरोप घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात खळबळ! टीममध्ये एन्ट्रीसाठी चक्क बनावट कागदपत्रे; स्टार खेळाडू अडचणीत, BCCIकडे तक्रार दाखल

Goa Politics: सर्व विरोधकांची एकजूट गरजेची! युरींचा महायुतीचा पुनरुच्चार; आप,आरजीला सोबत घेण्याची तयारी

Goa Nightclub Fire: अजय गुप्ताला पाच दिवसांची पोलिस कोठडी, रजिस्टरमधील बनावट नोंदीचा वापर

Goa Crime: कांदोळीतील व्हिलामध्ये चोरी, लाखोंचा ऐवज लंपास; कळंगुट पोलिसांत तक्रार

Mungul Gangwar: मुंगूल गँगवॉरप्रकरणी अमोघ नाईकला सशर्त जामीन मंजूर, इतरांच्या जामिनावर सोमवारी निवाडा

SCROLL FOR NEXT