Glenn Maxwell 
क्रीडा

World Cup 2023: 4,4,6,6,6 अन् मॅक्सवेलची 40 चेंडूत सेंच्युरी! अवघ्या 18 दिवसात मोडला जलद शतकाचा विश्वविक्रम

Glenn Maxwell Century: ग्लेन मॅक्सवेलने वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्ध 40 चेंडूत शतक ठोकत नवा विश्वविक्रम रचला आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, Australia vs Netherlands, Glenn Maxwell 40 ball Century:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बुधवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स संघात सामना होत आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने शतक करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. यावेळी 39 व्या षटकात चौथी विकेट गेल्यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मॅक्सवेल आला होता. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्याने डावाच्या 49 व्या षटकात दोन चौकार आणि नंतर सलग तीन षटकार ठोकत शतक पूर्ण केले.

त्याने त्याची खेळी करताना 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर पुढच्या 13 चेंडूत त्याने पुढच्या 50 धावा पूर्ण केल्या, असे त्याने अवघ्या 40 चेंडूत शतक पूर्ण केले.

त्यामुळे मॅक्सवेल वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने 18 दिवसांपूर्वीच म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी 2023 वर्ल्डकपमध्येच दक्षिण आफ्रिकेच्या एडेन मार्करमने केलेल्या विश्विविक्रम मोडला आहे. मार्करमने दिल्लीलाच श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात 49 चेंडूत शतक झळकावले होते.

वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद शतक करणारे क्रिकेटपटू

  • 40 चेंडू - ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स, दिल्ली, 2023)

  • 49 चेंडू - एडेन मार्करम (दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, दिल्ली, 2023)

  • 50 चेंडू - केविन ओ'ब्रायन (आयर्लंड विरुद्ध इंग्लंड, बंगळुरू, 2023)

  • 51 चेंडू - ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, सिडनी, 2015)

  • 52 चेंडू - एबी डीविलियर्स (दश्रिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, सिडनी, 2015)

मॅक्सवेलचा दिग्गजांच्या यादीत समावेश

वनडेमध्ये सर्वात वेगवान शतक करणाऱ्या पहिल्या 4 फलंदाजांमध्येही मॅक्सवेलचा समावेश झाला आहे. तो या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर असलेल्या एबी डिविलियर्सने वेस्ट इंडिजविरुद्ध 2015 साली जोहान्सबर्गला 31 चेंडूत शतक केले होते.

वनडेमध्ये सर्वात जलद शतक करणारे क्रिकेटपटू

  • 31 चेंडू - एबी डिविलियर्स (दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, 2015)

  • 36 चेंडू - कोरी अँडरसन (न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज, 2014)

  • 37 चेंडू - शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, नैरोबी, 1996)

  • 40 चेंडू - ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स, 2023)

वॉर्नरचेही शतक

या सामन्यात मॅक्सवेलपूर्वी ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरनेही शतक केले होते. त्याने 93 चेंडूत 104 धावांची शतकी खेळी केली. तसेच स्टीव्ह स्मिथने 71 धावांची आणि मार्नस लॅब्युशेनने 62 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 8 बाद 399 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT