krunal pandya deepak hooda  Dainik Gomantak
क्रीडा

एका म्यानात दोन तलवारी! हुड्डा-पांड्यांच्या एकाच टीममध्ये खेळण्यावर गंभीरची प्रतिक्रिया

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुडा आणि कृणाल पांड्या हे दोघेही आता लखनौ संघाकडून खेळताना दिसणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Lucknow Super Giants, IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) मेगा लिलावात लखनौ सुपर जायंट्सने अशा दोन खेळाडूंना खरेदी केले आहे जो वादाचा विषय ठरला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुडा (Deepak Hooda) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) हे दोघेही आता लखनौ संघाकडून खेळताना दिसणार आहेत. बडोदा संघात खेळताना दोघांमध्ये मोठा वाद झाला होता, त्यानंतर कृणालनेही कर्णधारपद सोडले होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

आता दोघेही लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे, संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरने सांगितले आहे की चांगली कामगिरी करण्यासाठी तुम्हाला मित्र असण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त एक चांगले व्यावसायिक बनण्याची गरज आहे. लखनऊ सुपर जायंट्सने 8.25 कोटी रुपये खर्च करून अष्टपैलू कृणाल पंड्याला आपल्या संघात घेतले आहे, तर दीपक हुडावर 5.75 कोटी रुपये खर्च केले आहेत. अलीकडेच दीपक हुडानेही वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

गौतम गंभीर काय म्हणाला?

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर म्हणाला की, मी सुद्धा बराच काळ खेळलो आहे, मी ज्यांच्यासोबत खेळलो ते सगळेच माझे मित्र नव्हते. पण आम्ही एक संघ म्हणून अधिक चांगला पराक्रम करण्याचा प्रयत्न केला, जरी मित्र निवडले तरी तुम्ही सामना जिंकणारच याची शाश्वती नाही म्हणून संघ महत्वाचा असतो. सर्वांना चांगले वातावरण मिळाले तर सर्व काही ठीक होईल. कोणताही वाद योग्य संवादातून सोडवला जाऊ शकतो, असे लखनौ संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर म्हणाला.

गेल्या वर्षी झाला होता वाद

गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली टूर्नामेंट खेळली जात असताना दीपक हुडा आणि कृणाल पांड्या या दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. कर्णधार कृणाल पंड्या अपशब्द वापरतो आणि धमकी देणारी वृत्ती बाळगतो, अशी तक्रार दीपक हुडाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, कृणाल पांड्याने हे आरोप फेटाळून लावले होते. या वादामुळे दीपक हुडाने बडोद्याकडून खेळणे बंद केले आणि राजस्थानकडून खेळायला सुरुवात केली होती.

लखनौ सुपर जायंट्स स्क्वॉड 2022 (Lucknow Super Giants Squad 2022)

ड्राफ्ट - केएल राहुल (17 कोटी), मार्कस स्टॉइनिस (9.2 कोटी), रवी बिश्नोई (4 कोटी)

फलंदाज/विकेटकीपर- क्विंटन डी कॉक (6.75 कोटी), मनीष पांडे (4.60 कोटी), मनन वोहरा (20 लाख), एविन लुईस (2 कोटी)

ऑलराउंडर खेळाडू - जेसन होल्डर (8.75 कोटी), दीपक हुडा (5.75 कोटी), कृणाल पंड्या (8.25 कोटी), के गौतम (90 लाख), आयुष बडोनी (20 लाख), काइल मेयर्स (50 लाख), करण शर्मा (20) लाख)

गोलंदाज - मार्क वुड (7.5 कोटी), आवेश खान (10 कोटी), अंकित राजपूत (50 लाख), दुष्मंता चमिरा (2 कोटी), शाहबाज नदीम (50 लाख), मोहसीन खान (20 लाख), मयंक यादव (20 लाख)

स्क्वॉड स्ट्रेंथ - 21(14 भारतीय, 7 परदेशी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT