IPL 2024 Auction Memes X
क्रीडा

IPL 2024 Auction: पैसाच पैसा! आयपीएल लिलावानंतर सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

IPL Auction Memes: मंगळवारी आयपीएल 2024 स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणार मीम्स व्हायरल झाले.

Pranali Kodre

IPL 2024 Players Auction, Memes Viral:

इंडियन प्रीमयर लीग 2024 स्पर्धा सध्या चर्चेत आहे. ही स्पर्धा जरी पुढील वर्षी खेळवली जाणार असली, तरी या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव नुकताच मंगळवारी (19 डिसेंबर) पार पडला. हा लिलाव दुबईतील कोका-कोला एरिनामध्ये झाला. हा लिलाव ऐतिहासिक ठरला.

पुढीलवर्षी होणारी आयपीएल हा या स्पर्धेचा 17 वा हंगाम आहे. दरम्यान, 17 हंगामांपैकी पहिल्यांदाच आयपीएल लिलाव परदेशात घेण्यात आला. यापूर्वी 16 हंगामाचे लिलाव भारतात झाले होते.

333 खेळाडूंपैकी 72 खेळाडूंना बोली

या लिलावात तब्बल 333 खेळाडू रिंगणात होते. यातील 72 खेळाडूंना बोली लागली, ज्यात 30 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना लागलेल्या बोलींनी इतिहास घडवला.

आयपीएल लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूला 20 कोटींहून अधिकची बोली लागली. स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने विक्रमी 24.75 कोटी रुपये मोजत संघात घेतले. तसेच कमिन्सवर सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांची बोली लावली. त्यामुळे हे दोघे आयपीएलमधील सर्वात महागडे खेळाडूही ठरले.

यांदाच्या लिलावात हर्षल पटेल सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला पंजाब किंग्सने 11.75 कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतले.

मीम्स व्हायरल

दरम्यान, या आयपीएल लिलावावेळी सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले. अनेक युजर्सने मजेशीर मीम्स शेअर करत संघांची मजा घेतली. बरेच मीम्स हे स्टार्क आणि कमिन्स या महागड्या ठरलेल्या खेळाडूंबद्दल होते.

महिला लिलावकर्ता

आयपीएल 2024 हंगामाच्या लिलावासाठी मलिका सागर यांनी लिलावकर्ता म्हणून काम पाहिले. त्यामुळे त्या लिलावकर्ता म्हणून आयपीएल लिलावात जबाबदारी सांभाळणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. यापूर्वी रिचर्ड मॅडली, ह्यू एडमीड्स आणि चारू शर्मा यांनी आयपीएल लिलावात लिलावकर्ता म्हणून काम पाहिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT