BCCI Dainik Gomantak
क्रीडा

माजी SC न्यायाधीश विनीत सरन बनले BCCI चे लोकपाल

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विनीत सरन यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) एथिक्स ऑफिसर आणि लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

BCCI: सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विनीत सरन यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) एथिक्स ऑफिसर आणि लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही दोन्ही पदे गेल्या वर्षभरापासून रिक्त होती. सरन यांनी न्यायमूर्ती (Retired) डीके जैन यांची जागा घेतली आहे. जैन यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी जूनमध्ये संपला होता. सरन हे ओडिशा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राहिले आहेत. त्यांनी कर्नाटक आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणूनही काम केले आहे.

बीसीसीआयच्या (BCCI) एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “माननीय न्यायमूर्ती सरन यांची नियुक्ती गेल्या महिन्यात झाली होती. सरन यांच्याशी संपर्क साधला असता, 65 वर्षीय माजी न्यायाधीश सरन म्हणाले की, मी स्वतः एक क्रिकेटचा (Cricket) चाहता आहे. ते पुढे म्हणाले, "मी गेल्या महिन्यात पदभार स्वीकारला आहे, परंतु अद्याप कोणताही आदेश पारित केलेला नाही."

दुसरीकडे, बीसीसीआयच्या सर्वोच्च समितीच्या आगामी बैठकीत देशांतर्गत सामन्यांसाठी (2023 पासून) मीडिया अधिकारांवर चर्चा केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT