Former BCCI president N Srinivasan Dainik Gomantak
क्रीडा

Former BCCI President: बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्या कंपन्यांवर ईडीचे छापे, कार्यालयांची घेतली झडती

Former BCCI President: भारतीय क्रिकेट परिषदेचे (BCCI) माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे.

Manish Jadhav

Former BCCI President: भारतीय क्रिकेट परिषदेचे (BCCI) माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी ईडीने एन श्रीनिवासन यांच्या अनेक कंपन्यांवर छापे टाकले. एन श्रीनिवासन यांच्या चेन्नईस्थित इंडिया सिमेंट कंपनीच्या ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ईडीने इंडिया सिमेंट कंपनीवर छापे टाकले. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन हे इंडिया सिमेंट कंपनीचे एमडी आहेत.

देशातील सर्वात मोठ्या सिमेंट कंपन्यांपैकी एक

दरम्यान, एन श्रीनिवासन यांची इंडिया सिमेंट कंपनी ही देशातील सर्वात मोठ्या सिमेंट कंपन्यांपैकी एक आहे. 2008 ते 2014 या कालावधीत आयपीएलमध्ये (IPL) चेन्नई सुपर किंग्जची मालकी इंडिया सिमेंट कंपनीकडे होती. इंडिया सिमेंट कंपनीचेही देशात विविध ठिकाणी प्लांट आहेत. वृत्तानुसार, आता ईडी इंडिया सिमेंटच्या ठिकाणांवर छापेमारी करुन तपास करणार आहे. त्यामुळे एन.श्रीनिवासन यांच्या अडचणी आता वाढू शकतात.

आयपीएल सट्टेबाजी घोटाळ्यात नाव आले

एन श्रीनिवासन हे आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जचे मालक आहेत. 2013 मध्ये एन श्रीनिवासन यांची टीम चेन्नई सुपर किंग्जचे नाव स्पॉट फिक्सिंगमध्ये आले होते. त्यानंतर सीएसकेवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, एन श्रीनिवासन यांनाही बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडावे लागले होते. 2008 मध्ये एन श्रीनिवासन पहिल्यांदा बीसीसीआयचे सचिव बनले होते.

यानंतर 2011 मध्ये त्यांना पहिल्यांदा बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष बनवण्यात आले. एन श्रीनिवासन यांचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संमिश्र राहिला आहे. अध्यक्ष असताना एन.श्रीनिवासन यांनी बोर्डाची आर्थिक स्थिती आणि क्रिकेटपटूंसाठीच्या सोयी-सुविधांमध्ये मोठी वाढ केली होती. एन श्रीनिवासन यांनी त्यांची कंपनी इंडिया सिमेंट स्थापन करण्यासाठी खूप मेहनत घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT