Footballer Brought Down a Flying Plane
Footballer Brought Down a Flying Plane Dainik Gomantak
क्रीडा

'या' फुटबॉलपटूने एका किकमध्ये उडणारे विमान खाली पाडले; वाचा मनोरंजक किस्सा

दैनिक गोमन्तक

Footballer Brought Down a Flying Plane: काही खेळ इतके उर्जेने भरलेले असतात की, खेळाडू उत्साहाने काहीही करू शकतात. बॉक्सिंग आणि कुस्तीसारख्या खेळांमध्ये तुम्ही ताकदीचे प्रदर्शन पाहिले असेलच, पण फुटबॉल (Football) आणि क्रिकेटमध्येही खेळाडू कधी कधी असे काही करून जातात की त्याचे किस्से वर्षानुवर्षे लोकांच्या लक्षात राहतात. एका पॅराग्वेयन फुटबॉलपटूने वयाच्या 17 व्या वर्षी असेच काही केले होते, जेव्हा उडणारे विमान त्याच्या फुटबॉल सरावात अडथळा आणत होते. (Footballer Roberto Gabriel Trigo shot down a flying plane in one kick)

तुम्ही विमान छतावरून जाताना पाहिलं असेल, कधी-कधी ही विमाने इतकी जवळून जातात की ती स्पष्टपणे आपल्याला दिसतात. दरम्यान, विमान इतक्या जवळ पण नसतात की, काहीतरी फेकल्या नंतर ते जाऊन त्याला लागेल जाऊ शकते. असाच पराक्रम एका फुटबॉलपटूने 60 वर्षांपूर्वी केला होता, जेव्हा त्याने आपल्या एका शॉटने आकाशात उडणारे विमान खाली पाडले होते.

फुटबॉलपटूने असा फटका मारला की विमान कोसळले,

फुटबॉलपटू रॉबर्ट गॅब्रिएल ट्रिगोचे (Roberto Gabriel Trigo) वय आज 80 वर्षे होणार आहे, त्यावेळी त्यांचे वय 17 वर्ष होते. ते असुनसियनच्या जनरल जीन्स फुटबॉल क्लबमध्ये खेळले आहेत. काही लोक म्हणतात की ते सराव सामना खेळत होते, तर काही लोक म्हणतात की अधिकृत खेळादरम्यान, एक लहान विमान सतत खाली उडत होते. विमानाने त्रासलेल्या ट्रॅगोने फुटबॉलला इतकी जोरात किक मारली की तो सरळ जाऊन विमानाच्या इंजिनला धडकला आणि विमान मोकळ्या मैदानात जाऊन कोसळले. ही घटना जमिनीपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर घडली आहे.

रॉबर्टो, आता 80 वर्षांचे झाले आहेत,

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जी व्यक्ती दररोज जमिनीच्या अगदी जवळून विमान उडवत होती ती व्यक्ती त्यांच्या ओळखीची होती. असे करू नकोस, नाहीतर एखाद्या दिवशी उंच फुटबॉलचा फटका मारून विमान खाली पाडू, असा इशाराही त्याने त्यावेळी दिला होता. रॉबर्टो हे करू शकतात यावर कोणाचाही विश्वास नसला तरी 1957 च्या फेब्रुवारीच्या सकाळी त्यांनी फुटबॉलने विमानाला खाली पाडलेच.

चिडलेले रॉबर्टो यांनी चेंडू सरळ वर विमानाच्या दिशेने मारला. यानंतर विमान अपघातामुळे ते अस्वस्थ झाले होते. पायलट सुखरूप असल्याचे समजल्यावर त्याच्या जीवात जीव आला आणि आता जनरल जीन्स क्लब राहिलेला नाही, पण त्याचे किस्से आजही प्रसिद्ध आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT