Football Dainik Gomantak
क्रीडा

फुटबॉल मॅचला ‘बॉक्सिंग डे’पासून सुरवात!

गतमोसमात त्यांना विजेतेपद थोडक्यात हुकल्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

दैनिक गोमन्तक

पणजी : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या 2021-22 मोसमातील आय-लीग फुटबॉल (Football) स्पर्धेस येत्या ‘बॉक्सिंग डे’पासून सुरवात होत आहे. गोव्यातील संघाची पहिली लढत केरळा ब्लास्टर्सविरुद्ध त्यादिवशी गतविजेत्या गोकुळम केरळाविरुद्ध (Kerala) होईल. कोरोना विषाणू महामारी निर्बंधामुळे यंदाची आय-लीग स्पर्धाही जैवसुरक्षा वातावरणात पश्चिम बंगालमधील (West Bengal) तीन मैदानावर खेळली जाईल. सामने कोलकाता येथील मोहन बागान मैदान, कल्याणी म्युनिसिपल स्टेडियम व नैहाटी स्टेडियमवर खेळले जातील. चर्चिल ब्रदर्सने आय-लीग स्पर्धा दोन वेळा (2008-09 व 2012-13) जिंकली आहे. गतमोसमात त्यांना विजेतेपद थोडक्यात हुकल्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

स्पर्धेत 13 संघ

आय-लीग स्पर्धेत यंदा 13 संघ आहेत. आंध्र प्रदेशचा श्रीनिधी डेक्कन एफसी संघाला थेट प्रवेश देण्यात आला आहे. यावेळच्या आय-लीग पात्रता फेरीत प्रथम स्थान मिळविलेला राजस्थान युनायटेड एफसी, तसेच दुसऱ्या स्थानावरील केंकरे एफसी हे नवे संघ आहेत. माजी विजेत्या चेन्नई सिटी एफसीने क्लब परवाना निकष पूर्तता न केल्यामुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर करण्यात आले असून केंकरे एफसीला संधी देण्यात आली. गोकुळम केरळा, चर्चिल ब्रदर्स, ट्राऊ एफसी, पंजाब एफसी, रियल काश्मीर, मोहम्मेडन स्पोर्टिंग, ऐजॉल एफसी, सुदेवा दिल्ली एफसी, इंडियन ॲरोज, नेरोका एफसी हे गतवेळचे संघ आहेत.

दोन टप्प्यात स्पर्धा

स्पर्धा यंदाही दोन टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्यात 13 संघ एकमेकांविरुद्ध साखळी पद्धतीने खेळतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पहिल्या सात संघांची अ गटात, तर बाकी सहा संघ ब गटात विभागणी केली जाईल. अ गटातील संघ विजेतेपदासाठी, तर ब गटातील संघ पदावनती टाळण्यासाठी खेळतील.

चर्चिल ब्रदर्सचे वेळापत्रक

ता. 26 डिसेंबर : विरुद्ध गोकुळम केरळा, ता. 31 डिसेंबर : विरुद्ध पंजाब एफसी, ता. 5 जानेवारी : सुदेवा दिल्ली, ता. 10 जानेवारी : ट्राऊ एफसी, ता. 15 जानेवारी : मोहम्मेडन स्पोर्टिंग, ता. 20 जानेवारी : राजस्थान युनायटेड, ता. 24 जानेवारी : ऐजॉल एफसी, ता. 29 जानेवारी : श्रीनिधी डेक्कन एफसी, ता. 3 फेब्रुवारी : विरुद्ध नेरोका एफसी, ता. 9 फेब्रुवारी : विरुद्ध रियल काश्मीर, ता. 14 फेब्रुवारी : विरुद्ध केंकरे एफसी, ता. 24 फेब्रुवारी : इंडियन ॲरोज.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT