Football Competition starts with goa police cup Dainik Gomantak
क्रीडा

Goa Police Cup : पोलिस कपने उघडणार फुटबॉलचा पडदा; 12 संघांचा सहभाग

आजपासून स्पर्धा; धुळेर-म्हापसा येथे पहिला सामना

Kishor Petkar

पणजी : कोविड-19 महामारी, तसेच त्यामुळे आलेले निर्बंध या पार्श्वभूमीवर दोन वर्षे राज्यातील फुटबॉलवर मर्यादा आल्या, आता यंदापासून पूर्ण मोसम खेळविण्याचे नियोजन गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) आखले आहे. त्याची सुरवात सोमवारपासून (ता. 22) गोवा पोलिस कप स्पर्धेद्वारे होईल.

गोवा पोलिसांच्या क्रीडा विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची यंदा 18वी आवृत्ती आहे. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर सोमवारी स्पर्धेतील पहिला सामना होईल. धेंपो ज्युनियर्स संघासमोर सेंट अँथनी मार्ना संघाचे आव्हान असेल. यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे प्रमुख पाहुणे असतील.

(Football Competition starts with goa police cup)

आठ ऑगस्टला अंतिम सामना

गोवा पोलिस कप स्पर्धेत यंदा प्रो-लीगमधील सहा, प्रथम विभागीय पाच व द्वितीय विभागीय एक मिळून 12 संघांत चुरस असेल. स्पर्धा बाद फेरी पद्धतीने खेळली जाईल. धेंपो स्पोर्टस क्लब, चर्चिल ब्रदर्स, साळगावकर एफसी व सेझा फुटबॉल अकादमी यांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. सामने धुळेरसह पर्रा, एला-जुने गोवे, शिरसई येथील मैदानावरही होतील. स्पर्धेचा अंतिम सामना 8 सप्टेंबर रोजी धुळेर येथे खेळला जाईल.

स्पर्धेच्या इतिहासात डोकावताना...

खाण उद्योगक्षेत्रातील गोसालिया समूहाने गोवा पोलिस दलास 1968 साली स्पर्धेसाठी रौप्य करंडक प्रदान केला. या समूहाच्या मालकीचा शांतीलाल स्पोर्टस क्लब हा संघही होता. स्पर्धेला 1968-69 मोसमात सुरवात झाली. स्पर्धेसाठी दिलेला चांदीचा करंडक 5.4 फूट उंचीचा असल्यामुळे स्पर्धेची भव्यताही वाढली.

सत्तरच्या दशकात ही राज्यातील प्रमुख स्पर्धा गणली जात असे. पहिल्या वर्षी वास्को स्पोर्टस क्लबने ही स्पर्धा जिंकली. मध्यंतरी या स्पर्धेच्या आयोजनात अनियमितता आली, पण 2015 पासून स्पर्धा पुन्हा नियमितपणे खेळविण्यात येऊ लागली. 2020मध्ये कोविडमुळे स्पर्धा होऊ शकली नाही.

संघांची चार गटांत विभागणी

अ गट : धेंपो क्लब, सेंट अँथनी मार्ना, धेंपो ज्युनियर्स

ब गट : चर्चिल ब्रदर्स, शापोरा युवक संघ, एफसी गोवा

क गट : साळगावकर एफसी, यंग बॉईज ऑफ टोंक, गोवा पोलिस

ड गट : सेझा फुटबॉल अकादमी, वेळसाव क्लब, यूथ क्लब ऑफ मनोरा

स्पर्धेतील मागील तीन विजेते

2018 : स्पोर्टिंग क्लब द गोवा

2019 : एफसी गोवा डेव्हलमेंट

2021 : पणजी फुटबॉलर्स

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT