FIFA World Cup 2022  Dainik Gomantak
क्रीडा

कतारने 'FIFA World Cup' साठी आणले खास कार्ड, जाणून घ्या वैशिष्ट्य

FIFA World Cup: एखाद्याला कतारमध्ये येऊन फुटबॉल विश्वचषकाची कोणतीही मॅच बघायची असेल तर त्याच्याकडे हया कार्ड असणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

फुटबॉल विश्वचषक 2022 या वर्षी 21 नोव्हेंबरपासून मध्य पूर्व देश कतारमध्ये सुरू होणार आहे. ही स्पर्धा 18 डिसेंबरपर्यंत चालणार असून एकूण 64 सामने खेळवले जाणार आहेत. विश्वचषकापूर्वीही त्यांच्या संघटनेबाबत सातत्याने काही बातम्या समोर येत आहेत. कधी चांगल्या बातम्या तर कधी वादाशी संबंधित बातम्या सतत येत असतात. आता बातमी आली आहे की, कतारने फिफा विश्वचषकासाठी खास कार्ड जारी केले आहे. त्याला हय्या कार्ड किंवा फॅन कार्ड (Fan Card) असे नाव देण्यात आले आहे. आता सौदी अरेबियानेही या कार्डला मान्यता दिली आहे.

* काय आहे हे कार्ड

हया कार्ड हे कतार (Qatar) सरकारने जारी केलेले दस्तऐवज आहे. जे फक्त फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी (FIFA World Cup) बनवले जाते. जर कोणाला कतारमध्ये येऊन फुटबॉल विश्वचषकाचा कोणताही सामना पाहायचा असेल तर त्याच्याकडे हे कार्ड असणे आवश्यक आहे.

या कार्डाशिवाय तो सामना पाहू शकणार नाही. पण, कार्डाव्यतिरिक्त तिकीट असणेही आवश्यक आहे. रिपोर्टनुसार, हे कार्ड वर्ल्ड कपच्या सर्व सामन्यांसाठी वैध असेल. म्हणजेच ज्याने एकदा घेतले आहे, त्याला या माध्यमातून उर्वरित सामने पाहता येणार आहेत.

प्रत्येक सामन्यासाठी वेगळे तिकीट खरेदी करण्याची गरज भासणार नाही. त्याच वेळी, सौदी अरेबियाने या कार्डला समर्थन देण्यासाठी केवळ मान्यता दिली नाही तर मल्टी-एंट्री-व्हिजिट-व्हिसा देखील सुरू केला आहे.

सौदी अरेबियाने (Saudi Arabia) सुरू केलेला मल्टी-एंट्री-व्हिजिट व्हिसा आता कतारच्या हया कार्डशी जोडला गेला आहे. वास्तविक, सौदी अरेबियाचा हा विशेष व्हिसा विश्वचषकासाठी हया कार्ड घेणाऱ्या सर्व पाहुण्यांसाठी असेल.

ज्यांच्याकडे हया कार्ड आहे ते सौदी अरेबियाला या विशेष व्हिसासाठी अर्ज करू शकतील. या व्हिसाची खास गोष्ट म्हणजे याच्या मदतीने तुम्ही सौदी अरेबियामध्ये 60 दिवस राहू शकाल. म्हणजेच या व्हिसाची वैधता विश्वचषकाचा पहिला सामना सुरू होण्याच्या 10 दिवस आधीपासून सुरू होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT