Lionel Messi Dainik Gomantak
क्रीडा

Argentina Qualification Scenario: मेस्सीच्या अर्जेंटिनासमोर 'राऊंड ऑफ 16'साठी अशी आहेत समीकरणे

अर्जेंटिनाने फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये सौदी अरेबियाविरुद्धच्या पराभवानंतर मेक्सिकोविरुद्ध 2-0 गोलफरकाने विजय मिळवत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

Argentina Qualification Scenario: अर्जेंटिनाने शनिवारी रात्री मेक्सिको विरुद्ध 2-0 अशा गोलफरकाने विजय मिळवत फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत आपले आव्हान कायम राखले आहे. अर्जेंटिनाचा या स्पर्धेत ग्रुप सी मध्ये समावेश आहे. या ग्रुपमध्ये सौदी अरेबिया, मेक्सिको आणि पोलंड हे संघही आहेत.

दरम्यान, अर्जेंटिनाला (Argentina) पहिल्या सामन्यात सौदी अरेबियाविरुद्ध धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यांना त्यांचे आव्हान कायम ठेवण्यासाठी मेक्सिकोविरुद्ध विजयाची नितांत आवश्यकता होती. त्यांनीही मेक्सिकोला पराभूत करत आपले आव्हान जिवंत ठेवले. आता त्यांच्यासमोर अंतिम 16 संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी काय समीकरण असेल, याबद्दल जाणून घेऊ

ग्रुप सीची समीकरणे

फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये (FIFA World Cup 2022) अर्जेंटिनाला साखळी फेरीतील अखेरचा सामना 1 डिसेंबर रोजी पोलंडविरुद्ध खेळायचा आहे. याच दिवशी मेक्सिको विरुद्ध सौदी अरेबिया या सी ग्रुपमधील संघात देखील सामना होणार आहे. त्यामुळे 1 डिसेंबर रोजी या ग्रुपमधील कोणते 2 संघ पुढे जाणार हे निश्चित होईल.

जर, अर्जेंटिनाने पोलंडला पराभूत केले, तर अर्जेंटिना सहज अंतिम 16 जणांमध्ये प्रवेश करतील. पण जर अर्जेंटिना जिंकली, तर सौदी अरेबिया आणि मेक्सिको यांच्यातील सामना सी ग्रुपमधून अंतिम 16 संघांमध्ये स्थान मिळवणारा दुसरा संघ निश्चित करेल.

जर सौदी अरेबिया जिंकले, तर ते स्पर्धेत पुढे जातील. पण, मेक्सिकोने सौदी अरेबियाला पराभूत केले, तर मात्र गोल फरकाचा विचार केला जाईल. तसेच सौदी अरेबिया आणि मेक्सिको सामना बरोबरीत सुटला, तर पोलंड आणि सौदी अरेबिया यांच्यात पुढील फेरीत कोण जाईल, याचा निर्णय गोल फरकावर निश्चित होईल.

मात्र, जर अर्जेंटिनाची पोलंडबरोबर बरोबरी झाली तर मात्र पुढील फेरीची समीकरणे अधिक रोमंचक होतील. जर असे झाले, तर अर्जेंटिनाला आशा बाळगावी लागेल की सौदी अरेबिया मेक्सिकोविरुद्ध पराभूत होतील. कारण, जर सौदी जिंकले, तर ते आणि पोलंड अंतिम 16 संघांमध्ये स्थान मिळवतील आणि अर्जेंटिनाचा प्रवास संपेल.

त्यामुळे अर्जेंटिनासाठी पोलंडविरुद्धचा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांना पराभूत होऊन तर चालणार नाहीच. पण त्यांना बरोबरी साधूनही समोरील आव्हाने अधिक किचकट बनवण्याची इच्छा नसेल. त्यामुळे त्यांना पोलंडविरुद्ध विजयासाठीच प्रयत्न करावे लागतील.

सध्या ग्रुप सीचा विचार केल्यास पोलंड 2 सामन्यांत एक विजय आणि एका बरोबरीसह 4 गुण मिळवून अव्वल क्रमांकावर आहे. तसेच अर्जेंटिना एक विजय आणि एक पराभवासह 3 गुण मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सौदी अरेबियाच्या नावावर एक विजय आणि एक पराभव आहे. त्यामुळे तेही 3 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मेक्सिको मात्र अखेरच्या क्रमांकावर आहेत. त्यांनी एक सामना बरोबरी केली असून एका सामन्यात पराभव स्विकारला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' सरकारी कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी; ओल्ड पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा

Horoscope 20 May 2026: चंद्राचे गोचर घडवणार चमत्कार! बुधवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; व्यवसायातून होणार अफाट धनलाभ

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT