FIFA U-17 Women's World Cup Dainik Gomantak
क्रीडा

FIFA U-17 Women's World Cup : गोव्यात ‘वर्ल्डकप’चे उपांत्यसह 16 सामने

17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक ः स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, 11 ऑक्टोबरपासून लढती

Kishor Petkar

येत्या ऑक्टोबरमध्ये भारतात होणाऱ्या 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत गोवा प्रमुखकेंद्र असेल. दोन्ही उपांत्य लढतीसह फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एकूण 16 सामने खेळले जातील.

फिफा आणि स्थानिक आयोजन समितीने (एलओसी) यांनी स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक बुधवारी जाहीर केले. 11ऑक्टोबरपासून सामने खेळले जातील. यजमान भारताचे सर्व सामने ओडिशातील भुवनेश्वर येथे होतील. गोव्यात दोन्ही उपांत्य लढती, तर महाराष्ट्रातील नवी मुंबई येथे 30 ऑक्टोबर रोजी तिसऱ्या क्रमांकाचा आणि अंतिम सामना खेळला जाईल.

गटसाखळीतील सर्व 24 सामने 18 ऑक्टोबरला संपतील. उपांत्यपूर्व फेरीतील सामने 21 व 22 ऑक्टोबरला खेळले जातील. या फेरीतील 21 ऑक्टोबरचे दोन्ही सामने नवी मुंबई येथे, तर 22 ऑक्टोबरचे दोन्ही सामने गोव्यात होतील. 26 ऑक्टोबर रोजी दोन्ही उपांत्य लढती गोव्यातच होतील.

16 संघ 32 सामने

स्पर्धेत एकूण 16 संघांचा सहभाग असेल. यजमान भारतासह चीन, जपान, मोरोक्को, नायजेरिया,टांझानिया, कॅनडा, मेक्सिको, अमेरिका, ब्राझील, चिली, कोलंबिया, न्यूझीलंड, फ्रान्स, जर्मनी, स्पेन हे संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. भारत या स्पर्धेत प्रथमच खेळत आहे. स्पर्धेचा ड्रॉ 24 जून रोजी काढण्यात येईल.

फातोर्ड्यात एकूण 16 लढती

फातोर्डा स्टेडियम 11 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत गटसाखळीतील 12 सामने होतील. याशिवाय उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीतील प्रत्येकी दोन मिळून एकूण 16 सामने पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळले जातील. गोव्यात स्पर्धेतील ब, ड, अ आणि क गटातील संघांचे सामने होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT