FC Goa Dainik gomantak
क्रीडा

नामुष्की टळली, एफसी गोवाची प्रथमच गोल न स्वीकारता विजयी कामगिरी

एफसी गोवाचा स्पर्धेतील पुढील सामना 14 जानेवारी रोजी नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध होईल

दैनिक गोमन्तक

पणजी : एफसी गोवाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेच्या आठव्या मोसमातील दहाव्या सामन्यासाठी गोलरक्षक बदलला आणि प्रथमच गोल न स्वीकारता विजयी कामगिरी केली. एफसी गोवाने शनिवारी रात्री बांबोळी येथे माजी विजेत्या केरळा (Kerala) ब्लास्टर्सला एका गोलने हरवले.

या लढतीसाठी प्रशिक्षक डेरिक परेरा यांनी मागील नऊ लढतीत 18 गोल स्वीकारलेल्या धीरज सिंग याला बदलून `गोलनेट`चे संरक्षण करण्यासाठी नवीन कुमार याला संधी दिली. मोसमातील पहिलाच सामना खेळताना नवीनने क्लीन शीट राखली, जी एफसी गोवातर्फे मोसमातीलही पहिलीच ठरली. एकंदरीत त्यांचा हा स्पर्धेतील तिसरा, तर डेरिक यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला विजय ठरला. एफसी गोवाचा स्पर्धेतील पुढील सामना 14 जानेवारी रोजी नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध होईल.

अभिमानास्पद विजय : डेरिक

एफसी गोवासाठी (goa) चेन्नईयीनविरुद्धचा सामना सोपा नव्हता. कोविडच्या संशयावरून काही खेळाडू विलगीकरणात गेले, त्यामुळे संघाला सराव सत्र चुकले. मात्र तरीही संघाने प्रभावी कामगिरी करत उत्तरार्धात स्पॅनिश खेळाडू होर्गे ओर्तिझ याने केलेल्या गोलच्या बळावर पूर्ण तीन गुणांची कमाई केली. ``आमच्यासाठी अभिमानास्पद ठरावा असा हा विजय आहे. सामन्यापूर्वीची परिस्थिती पूरक नव्हती. तंदुरुस्तीचा प्रश्न होताच, शिवाय मानसिकदृष्ट्याही तणाव होता. यावरून आमच्यासाठी स्थिती किती प्रतिकूल होती हे लक्षात येते,`` असे सामन्यानंतर प्रशिक्षक (coach) डेरिक परेरा यांनी सांगितले. आपल्या मार्गदर्शनाखाली संघाने विजय नोंदविला याचा आनंद आहेच, त्यापेक्षा जास्त समाधान खेळाडूंची मेहनत, त्यांनी पेललेल्या जबाबदारीने झाले, असे डेरिक यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT