Juan Ferrando Dainik Gomantak
क्रीडा

सलग पराभवामुळे एफसी गोवा चिंतित; नॉर्थईस्टविरुद्ध विजयासाठी प्रयत्न

मात्र शनिवारी नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध (Northeast United) आपला संघ विजय मिळवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमन्तक

पणजी: इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत लागोपाठ दोन सामने गमावल्यामुळे, तसेच सेटपिसेस व्यूहरचनेत गोल स्वीकारल्यामुळे एफसी गोवाचे प्रशिक्षक हुआन फेरांडो (Juan Ferrando) चिंतित आहेत. मात्र शनिवारी नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध (Northeast United) आपला संघ विजय मिळवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एफसी गोवा (FC Goa) आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यातील सामना शनिवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. खलिद जमिल यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्टला बंगळूर एफसी (2-4) व चेन्नईयीन एफसी (1-2) या संघांकडून पराभव स्वाकारावा लागला, तर केरळा ब्लास्टर्सला गोलशून्य बरोबरीत रोखून गुणाची कमाई केली. एफसी गोवास मुंबई सिटी (0-3) व जमशेदपूर एफसी (1-3) संघाविरुद्ध हार पत्करावी लागली, त्यामुळे शून्य गुणांसह माजी उपविजेता संघ तळाच्या अकराव्या स्थानी आहे.

``लागोपाठच्या दोन पराभवामुळे आम्ही निराश आहोत, पण फुटबॉल तसेच खेळात हे असेच जीवन असते. अशा परिस्थितीत भक्कम मानसिकता प्रदर्शित करत आम्हाला मेहनत घ्यायची आहे. नवा दिवस, नवे आव्हान यानुसार आम्ही शंभर टक्के उद्याच्या सामन्याचा विचार करत आहोत. भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आहे,`` असे फेरांडो यांनी नमूद केले.

सेटपिसेसवर बचावात त्रुटी

एफसी गोवाने पहिल्या दोन लढतीत सहा गोल स्वीकारले आहेत, त्यापैकी चार गोल सेटपिसेसवर आहेत. ही बाब फेरांडो यांना सलत आहे. संघ एकाग्रतेत कमी पडत असल्याचेही त्यांना वाटते. ``सेटपिसेसवर आम्ही चुका करतोय. त्यात सुधारणा हवी,`` असे 40 वर्षीय प्रशिक्षक म्हणाले. मध्यफळीतील हुकमी खेळाडू ब्रँडन फर्नांडिस दुखापतीमुळे सलग तिसऱ्या सामन्यास मुकेल, असेही त्यांनी नमूद केले. साल्वादोर द मुंद पंचायत मैदानासंदर्भात अडचड निर्माण झाल्याने सराव प्रक्रियेवर परिणाम झाल्याचेही ते म्हणाले.

नामुष्कीची पुनरावृत्ती टाळणार?

यापूर्वी 2016 मधील आयएसएल स्पर्धेत झिको प्रशिक्षक असताना एफसी गोवा संघ सुरवातीच्या तीन सामन्यांत पराभूत झाला होता. आता त्यांनी लागोपाठ दोन सामने गमावले आहेत. पाच वर्षांपूर्वीच्या नामुष्कीची पुनरावृत्ती फेरांडो यांचा संघ टाळणार का याचे उत्तर शनिवारी रात्री मिळेल.

गतमोसमात दोन्ही बरोबरी

गतमोसमात (2020-21) एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यातील दोन्ही सामने गोलबरोबरीत राहिले. फातोर्डा येथे 30 नोव्हेंबर 2020 रोजी 1-1 अशी, तर वास्को येथे 4 जानेवारी 2021 रोजी 2-2 अशी गोलबरोबरी झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT