Derrick Pereira  Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: सुरक्षित वातावरणातच एफसी गोवा खेळणार

सुरक्षित वातावरण असल्यास एफसी गोवा अवश्य खेळेल, अशी ग्वाही संघाचे मुख्य प्रशिक्षक डेरिक परेरा (Derrick Pereira) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या क्षणी खेळाडूंचे आरोग्य जास्त महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

किशोर पेटकर

पणजी : आव्हानात्मक कोविड परिस्थितीत सामन्यासाठी सुरक्षित वातावरण असल्यास एफसी गोवा अवश्य खेळेल, अशी ग्वाही संघाचे मुख्य प्रशिक्षक डेरिक परेरा (Derrick Pereira) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या क्षणी खेळाडूंचे आरोग्य जास्त महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

इंडियन सुपर लीग (Indian Super League) स्पर्धेतील जबाबदार लोक योग्य निर्णय घेतील. स्पर्धा लांबणीवर टाकावी, की सुरू राहावी हे ठरविण्याचा अधिकार आपल्याला नाही, असेही डेरिक यांनी नमूद केले. एफसी गोवा संघाचा सामना बुधवारी (ता. 19) बांबोळी येथील स्टेडियमवर नियोजित आहे. त्यावेळी स्पर्धेत अजूनपर्यंत एकही सामना न जिंकलेल्या ईस्ट बंगालचे त्यांना आव्हान असेल. एफसी गोवाचे सध्या 13, तर ईस्ट बंगालचे 6 गुण आहेत.

कोविड-19 मुळे कठीण परिस्थिती उद्भवल्यामुळे आयएसएल स्पर्धेत शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस सामना खेळविण्यात आला नाही. अखेरीस मंगळवारी स्पर्धेला पुन्हा सुरवात झाली व नॉर्थईस्ट युनायटेड व ओडिशा एफसी यांच्यातील सामना झाला. या पार्श्वभूमीवर डेरिक बोलत होते.

खेळाडूंचे मानसिक स्वास्थ महत्त्वाचे

डेरिक यांनी सांगितले, की एक खेळाडू वगळता बाकी परदेशी खेळाडू निवडीसाठी उपलब्ध आहेत. ``कोविडसारख्या परिस्थितीत खेळाडूंचे मानसिक स्वास्थ महत्त्वाचे आहे. एफसी गोवा संघ प्रतिकुल परिस्थितीतही एकसंध आणि मजबूत आहे,`` असे संघातील वातावरणाबाबत डेरिक म्हणाले. कोविड बाधित, विलगीकरण यामुळे नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध 14 जानेवारी रोजी एफसी गोवा संघ प्रमुख खेळाडूंविना खेळला होता, तो सामना त्यांनी 1-1 गोलबरोबरीत राखला.

आव्हानात्मक प्रतिस्पर्धी

बुधवारच्या सामन्याविषयी डेरिक यांनी सांगितले, की ``ईस्ट बंगाल संघ बचावात्मकदृष्ट्या कठीण प्रतिस्पर्धी आहे. ते आव्हानात्मक असून शेवटपर्यंत झुंज देतात. आम्हाला आक्रमण आणि बचावात समतोल साधावा लागेल. संधीवर गोल करणे अत्यावश्यक आहे.`` नॉर्थईस्टविरुद्ध एफसी गोवाने वर्चस्व राखले, पण आक्रमणात धारदार खेळ न केल्यामुळे बरोबरीवर समाधान मानावे लागल्याचे त्यांनी मान्य केले.

ईस्ट बंगालसाठी नवा प्रशिक्षक

आयएसएल स्पर्धेत 11 सामन्यानंतरही विजयाविना असलेला ईस्ट बंगाल संघ बुधवारी नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली खेळेल. अंतरिम प्रशिक्षक रेनेडी सिंग यांच्याकडून स्पेनचे मारियो रिव्हेरा यांनी सूत्रे हाती घेतील. ``आयएसएलमध्ये प्रथमच एखाद्या संघाचे प्रशिक्षकपद मी भूषवत आहे. सध्याच्या सांघिक कामगिरीचा विचार करण्यापेक्षा खेळाडूंचा दृष्टिकोन बदलण्यास प्राधान्य आहे. गुणतक्त्यावरून तुमची गुणवत्ता ठरू शकत नाही. मागील खराब कामगिरी विसरून पुढील प्रत्येक सामन्यात सर्व आघाड्यांवर खेळ उंचावण्याचे आमचे लक्ष्य आहे,`` असे रिव्हेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT