FC Goa player

 

Dainik gomantak

क्रीडा

गोवा एफसी खेळाडूंचे कौतुक, परेरा यांच्या मार्गदर्शनात पार पडला सामना

स्थिती हाताळण्याइतपत संघातील खेळाडू परिपक्व आहेत. एकंदरीत परिस्थितीत संघाने बजावलेली कामगिरी छान झाली

दैनिक गोमन्तक

पणजी : आमची कामगिरी उत्कृष्ट नव्हती, पण खेळाडूंच्या लढाऊ वृत्तीचे आम्ही कौतुक करतो, असे एफसी गोवाचे सहाय्यक प्रशिक्षक क्लिफर्ड मिरांडा यांनी ओडिशा एफसीविरुद्धच्या बरोबरीनंतर सांगितले.

इंडियन सुपर लीग (आयएसएल) (ISL) फुटबॉल (Football) स्पर्धेच्या आठव्या मोसमात वास्को येथील टिळक मैदानावर शुक्रवारी रात्री एफसी गोवा व ओडिशा एफसी यांच्यातील सामना 1-1 गोलबरोबरीत राहिला. एफसी गोवा आता सलग चार सामने अपराजित असून त्यांच्या खाती आठ गुण आहेत. हुआन फेरांडो यांच्या राजीनाम्यानंतर एफसी गोवा संघाचा डेरिक परेरा यांच्या मार्गदर्शनाखालील हा पहिलाच सामना होता.

ओडिशाविरुद्ध सामन्यानंतर क्लिफर्ड यांनी सांगितले, की ``निश्चितच आमची कामगिरी उत्कृष्ट नव्हती, पण आम्ही खेळाडूंच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक करतो. त्यांनी शेवटपर्यंत झुंज दिली, हे आश्वासक चित्र आहे. आमचा संघ चांगला आहे, एकसंध आहे. काही वेळा संघ अपेक्षेनुसार चांगला खेळत नाही, तेव्हा आम्हाला आनंद होत नाही, पण अखेरीस एक गुण काहीही नसण्यापेक्षा चांगलाच असतो.``

फेरांडो यांनी प्रशिक्षकपद सोडल्यानंतरच्या परिस्थितीबाबत क्लिफर्ड यांनी सांगितले, की अशाप्रकारची स्थिती हाताळण्याइतपत संघातील खेळाडू परिपक्व आहेत. एकंदरीत परिस्थितीत संघाने बजावलेली कामगिरी छान झाली.

फेरांडो यांच्याप्रती आभारी

क्लिफर्ड मिरांडा यापूर्वी सर्जिओ लोबेरा, तसेच हुआन फेरांडो आणि आता डेरिक परेरा यांचे सहाय्यक आहेत. त्याविषयी क्लिफर्ड म्हणाले, `त्यांच्यासमवेत काम करण्याचा अनुभव आनंददायी आहे. विशेषतः हुआन यांच्यासोबतचे काम भावले, कारण हुआन यांनी माझ्यावर आणि माझ्या कामावर विश्वास ठेवला, प्रेम केले आणि आदर दिला. त्यांच्यासोबत माझे काम अतिशय फलदायी आणि त्यापेक्षा चांगले होते. एफसी गोवा (goa) संघात त्यांनी वर्षभरात मला खूप मोठी जबाबदारी दिली. मी त्यांच्याप्रती नेहमीच आभारी असेन. माझ्याकडे त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर याव्यतिरिक्त काहीही नाही.``

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना; गरज भासल्यास नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी ग्वाही

Goa Education: उज्ज्वल भविष्यासमोर गळतीचे मोठे आव्हान! 28 % विद्यार्थी पोहोचत नाहीत बारावीपर्यंत; राज्यातील स्थिती, 'युडीआयएसई प्लस' अहवालातून समोर

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

Goa Weather Update: मुसळधार पावसानंतर राज्यात दिलासादायक चित्र; पावसाचा जोर ओसरला, शेतकरी हवालदील

Noida Fire: नोएडातील पाच मजली इमारतीला भीषण आग; दोन जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT