Goa Football News
Goa Football News Dainik Gomantak
क्रीडा

बाणावली : भरपाई वेळेतील गोलमुळे एफसी गोवाचा विजय हुकला

दैनिक गोमन्तक

पणजी : हैदराबाद एफसीच्या कौस्तव दत्ता याने भरपाई वेळेतील सहाव्या मिनिटास केलेल्या गोलमुळे एफसी गोवास रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेत विजय हुकला. बाणावली येथे झालेला सामना गुरुवारी 2-2 असा गोलबरोबरीत राहिला.( FC Goa lost football tournament )

स्पर्धेतील आणखी एका सामन्यात नागोवा येथील मैदानावर बंगळूर एफसीने सलग चौथा विजय नोंदविला. तसेच राहुल राजू याच्या दोन गोलच्या बळावर त्यांनी मुंबई सिटी एफसीचा 5-0 फरकाने धुव्वा उडविला. बंगळूरचे आता स्पर्धेत 12 गुण झाले असून मुंबई सिटीस सलग चौथा पराभव पत्करावा लागला. राहुलने अनुक्रमे 17 व 45+1 व्या मिनिटास गोल केला. याशिवाय लास्टबॉर्न मॉफनियांग याने पाचव्या, तर रॉबिन यादव याने 87 व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. मुंबई सिटीच्या गौतम विरवानी याने 79 व्या मिनिटास केलेल्या स्वयंगोलमुळेही बंगळूरची आघाडी वाढली.

अखेरच्या टप्प्यात नाट्य

हैदराबादविरुद्ध एफसी गोवा संघ विश्रांतीला 1-0 फरकाने आघाडीवर होता. लेस्ली रिबेलोने 21 व्या मिनिटास गोल केला. 89 व्या मिनिटास सी. लालचुंगनुंगा याने हैदराबादला बरोबरी साधून दिली. हा गोल कौस्तवच्या असिस्टवर झाला. 90+4 व्या मिनिटास वासीम इनामदार याच्या गोलमुळे एफसी गोवाने आघाडी प्राप्त केली, मात्र 90+६ व्या मिनिटास वीस वर्षीय कौस्तव दत्ताने गोल केल्यामुळे हैदराबादला बरोबरी साधता आली. दोन्ही संघांची ही स्पर्धेतील पहिली बरोबरी ठरली. प्रत्येकी चार सामने खेळल्यानंतर एफसी गोवा व हैदराबाद एफसीचे समान चार गुण झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT