Fc Goa Dainik Gomantak
क्रीडा

Super Cup Football : एफसी गोवा निसटत्या फरकाने विजयी

गोकुळम केरळाविरुद्ध ग्वोर्रोचेनाचा गोल निर्णायक

किशोर पेटकर

एफसी गोवा संघाने सुपर कप फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी निसटत्या फरकाने विजय नोंदविताना गोकुळम केरळावर 1-0 फरकाने मात केली. सामना केरळमधील कोझिकोड येथील ईएमएस कॉर्पोरेशन स्टेडियमवर झाला.

सामन्याच्या 90व्या मिनिटास कर्णधार इकेर ग्वोर्रोचेना याने नोंदविलेला गोल निर्णायक ठरला, त्यामुळे एफसी गोवास स्पर्धेतील पहिला विजय नोंदविता आला. ‘क’ गटात अगोदरच्या लढतीत त्यांना जमशेदपूर एफसीकडून 5-3 फरकाने पराभूत व्हावे लागले होते.

गोकुळम केरळाचा हा सलग दुसरा पराभव ठरला. पहिल्या लढतीत ते एटीके मोहन बागानविरुद्ध 5-1 फरकाने हरले होते.

एफसी गोवाने शुक्रवारी सामन्यावर वर्चस्व राखले, पण गोलसाठी शेवटच्या मिनिटापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. त्यांचा हुकमी मध्यरक्षक नोआ सदावी याने धारदार खेळ केला. तोच सामन्याचा मानकरी ठरला.

सामन्याच्या 55व्या मिनिटास व्ही. एस. श्रीकुट्टन याने गोकुळम केरळासाठी गोल केला होता, परंतु तो ऑफसाईड ठरल्यामुळे गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली. सामना बरोबरीत राहण्याची शक्यता असताना सदावी आणि ग्वोर्रोचेना यांच्यातील सुरेख समन्वय एफसी गोवासाठी फायदेशीर ठरला.

गोकुळम केरळाचा गोलरक्षक शिबिन राज याने सदावी याचा फटका रोखला, मात्र त्याचवेळी रिबाऊंडवर ग्वोर्रोचेना याने अचूक फटका मारताना चूक केली नाही. एफसी गोवाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना एटीके मोहन बागानविरुद्ध होईल. जमशेदपूरविरुद्ध अखेरच्या लढतीत आता गोकुळम केरळा प्रतिष्ठेसाठी खेळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress Crisis: गोव्यात काँग्रेसला पर्याय शोधत विरोधकांची तिसरी आघाडी तयार? BJP विरोधात नवे प्रादेशिक पक्ष सज्ज

Brock Lesnar Retirement: 10 वेळचा WWE वर्ल्ड चॅम्पियन ब्रॉक लेसनर निवृत्त; म्हणाला, 'योग्य वेळी थांबण्याचा निर्णय...'

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT