Brandon Fernandes Dainik Gomantak
क्रीडा

नवा मोसम, नवा नेता; एफसी गोवाचे कर्णधारपद ब्रँडनकडे

अनुभवी मध्यरक्षकासह सेरिटन, ग्लॅन, मार्क यांच्याकडेही जबाबदारी

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: एफसी गोवाने (FC Goa) आगामी 2022-23 फुटबॉल मोसमसाठी नेतृत्वपदासाठी चौघांची निवड केली आहे, त्यापैकी अनुभवी ब्रँडन फर्नांडिस (Brandon Fernandes) संघाचा मुख्य कर्णधार असेल, तसेच सेरिटन फर्नांडिस, ग्लॅन मार्टिन्स यांच्यासह स्पॅनिश खेळाडू मार्क व्हालेंते यांच्याकडेही जबाबदारी असेल.

एफसी गोवा संघ व्यवस्थापनाने सोमवारी कर्णधार समुहाची घोषणा केली. कार्लोस पेनया यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाच्या यंदाच्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेतील मोहीम येत्या 12 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. कोलकाता येथे ईस्ट बंगालविरुद्ध पहिली लढत होईल.

संघातील अनुभवी खेळाडू

ब्रँडन फर्नांडिस हा एफसी गोवा संघातील अनुभवी खेळाडू आहे. आयएसएल खेळाडू निवड प्रक्रियेत या संघाने गोमंतकीय मध्यरक्षकाला 2017-18 मध्ये निवडले. तेव्हा तो 23 वर्षांचा होता. भारताचा आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेला ब्रँडन सध्या 27 वर्षीय असून एफसी गोवाचा तो मुख्य आधारस्तंभ आहे. सलग पाच मोसम त्याने संघाचे प्रतिनिधित्व केले असून सहाव्या मोसमासाठी सज्ज झाला आहे. दोन मोसमापूर्वी एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत एफसी गोवाचे दोन्ही गोल ब्रँडनच्या असिस्टवर झाले होते.

‘घरच्या क्लबचे नेतृत्व हा बहुमान’

घरच्या (होम) क्लबचे आयएसएल स्पर्धेत नेतृत्व करणे हा मोठा बहुमान आहे, असे ब्रँडनने संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्यानंतर सांगितले. ‘‘सहकाऱ्यांचा माझ्यावर विश्वास आहे हा व्यक्तीगत फायदा आहे. जबाबदारीचा मी आनंद लुटतो. गतमोसमातही मी नेतृत्व समुहाचा भाग होतो. नव्या मोसमात नेतृत्व प्रमुख या आव्हानाकडे मी आश्वासकपणे पाहत आहे. आमच्याकडे असाधारण खेळाडूंचा चमू आहे आणि क्लबला यश मिळवून द्यायचे या समान ध्येयाने सारेजण मेहनत घेत आहेत. त्यांचे नेतृत्व करण्यासाठी मी उत्साहित आहे,’’ अशी प्रतिक्रिया ब्रँडनने दिली.

नव्या कर्णधारावर प्रशिक्षक खूष

ब्रँडनला संघाचा मुख्य कर्णधार नियुक्त केल्याने मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी खूष आहेत. ‘‘ब्रँडनसाठी मी आनंदी आहे, कारण क्लबमधील सारेजण व चाहते त्याला श्रेय देतात. निष्ठा आणि वचनबद्धतेसाठी तो उत्तम उदाहरण आहे. मैदानावर, तसेच मैदानाबाहेरील त्याचे व्यक्तिमत्त्व अद्‍भूत आहे. त्याचा सारा अनुभव आणि कौशल्य संघातील खेळाडूंना धडा देणारे आणि संघ या नात्याने विकसित करणारे आहे,’’ असे आपल्या कर्णधाराचे कौतुक करताना पेनया म्हणाले.

नव्या कर्णधाराची कारकीर्द

एफसी गोवातर्फे आयएसएल सामने : 69

एकंदरीत एफसी गोवाचे प्रतिनिधित्व सामने : 85

आयएसएल स्पर्धेत : 05 गोल, 19 असिस्ट

एएफसी चँपियन्स लीगमध्ये : 02 असिस्ट

विजेतेपद : सुपर कप 2019, आयएसएल लीग विनर्स शिल्ड 2019-20, ड्युरँड कप 2021

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT