Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: रेकॉर्डसाठी खेळतोय किंग कोहली? माजी क्रिकेटपटूने 'त्या' 10 चेंडूंची करुन दिली आठवण

IPL 2023: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्म आहे.

Manish Jadhav

IPL 2023: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्म आहे. या मोसमात खेळलेल्या 3 पैकी 2 सामन्यात त्याने अर्धशतके झळकावली आहेत.

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही कोहलीने शानदार खेळी खेळली. मात्र असे असतानाही न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज सायमन डोलने विराट कोहलीवर टीका केली. त्याने कोहलीवर काय टीका केली, ते जाणून घेऊया...

दरम्यान, विराटने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध (Lucknow Super Giants) आक्रमकपणे आपल्या डावाची सुरुवात केली. त्याने येताच मोठे फटके मारण्यास सुरुवात केली, ज्यामुळे तो अवघ्या 25 चेंडूत 42 धावांपर्यंत पोहोचला. पण यानंतर कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी म्हणजेच 8 धावा करण्यासाठी 10 चेंडू घेतले.

न्यूझीलंडचा माजी खेळाडू सायमन डोलला नेमके हेच खटकले. कोहलीची ही संथ शैली त्याला आवडली नाही.

अशा परिस्थितीत सामन्यादरम्यान समालोचन करताना तो म्हणाला की, 'कोहलीने आपल्या डावाची सुरुवात एखाद्या हायस्पीड ट्रेनप्रमाणे केली, तो मोठे फटके मारत होता. पण त्याने 42 वरुन अर्धशतकापर्यंत पोहोचण्यासाठी 10 चेंडू घेतले. त्याला त्याच्या रेकॉर्डची चिंता आहे.'

दुसरीकडे, इंडियन प्रीमियर लीगमधील विराट कोहलीचे हे 46 वे अर्धशतक होते. त्याने 138 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 44 चेंडूत 61 धावा केल्या, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 4 षटकारही दिसले.

ऑरेंज कॅपच्या यादीतही तो चौथ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) आतापर्यंत 3 सामन्यात 82 च्या सरासरीने 164 धावा केल्या आहेत. मात्र, येत्या सामन्यांमध्ये विराट कोणत्या इराद्याने फलंदाजी करतो हे पाहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT